उत्तराखंडचा राज्यपाल

माझ्या जीवनाचे ध्येय हाय कि एकदा उत्तराखंड राज्याचा राज्यपाल व्हायचं. लांब डोंगार दऱ्याखोऱ्यात जाऊन बसायचं. विशेषतः विधानसभेचा निकाल डिक्लेर झाला कि त्या आमदार गड्यास्नी गावायचंच नही, डोंगरात लपून बसायचं. छानपैकी आवरून मध्यरात्री शपथा द्यायच्या , उत्तराखंडातंनं हिलीक्याप्टर विमान घेऊन त्यात गाणी लावून नागीणडँस वगैरे करत यायचं. पायलटच्या बाजूला बसून त्या डोंगराजवळंनं हिलीक्याप्टर हाण बघू म्हणून त्याला खवळत बसायचं. उन्हाळ्यात उत्तराखंडातंनं थेट रामलिंगच्या डोंगरावर करवंदं खायला यायचं. मजा असते राव राज्यपाल म्हणजे. कितीका शिकलेली अधिकारी असंनात राज्यपाल आला म्हणटलं कि जोधपूरी घालून रिसीव कराय येतेत प्रोटोकॉलनं. आणि काम म्हणटलं तर कायबी नही. निस्ता मज्जाच मज्जा. 😎☺️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं