आयपीएल : कोरोना
सध्या कोरोनाने थैमान घातलंय. सर्वत्र भयंकर अशी परिस्थिती झालीय. तरी IPL चे सामने चालू आहेत म्हणून BCCI ला काही जण दोष देऊ लागलेत. काही वृत्तपत्रांनी IPL च्या बातम्या छापणार नाही अशी घोषणा केलीय.
भारतात IPL लोकप्रिय आहे. तुम्ही हॉटस्टारवर जर बघत असाल तर ९० लाख लोक लाईव्ह बघत असतात. इतर बाकी ठिकाणी करोडो लोक बघत असतील याबद्दल शंका नाही. क्रिकेट हा मनोरंजनाचा खेळ आहे. ते खेळाडू पुर्ण काळजी घेऊन खेळालेत. अक्षर पटेल सारखा खेळाडू पॉझिटिव्ह आला होता तो परत निगेटिव होऊन सामने खेळू लागला.
भारतातल्या नागरिकांना एक कायदा तर खेळाडूंना एक हा जरी दुजाभाव होत असला तरी, कुठंतरी कोट्यावधी लोक क्रिकेट आनंदाने बघतात ही गोष्ट ही महत्वाची आहे. लोकांना या टेंशनच्या वातावरणात थोडं मनोरंजन होतंय. तर त्यावर आक्षेप घ्यायचं काही कारण नसावं. ते खेळाडू पैशासाठी खेळतात, BCCI ही कमावते ही गोष्ट खरी आहे. पण त्यात वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही . काल पॅट कमीन्सने केलेली मदत ही नजर अंदाज करू नये. पुढे इतरही लोक मदत करतील. काहितरी चांगलं करतोय या नादात देशवासीयांच्या दोन घटकांचे मनोरंजन बंद करू नये.
27 Apr 2021
टिप्पण्या