गव्याचे मॉब लिचींग
चारदोन महिन्यामागं काही पै-पाव्हणे घरी आलते, जैन धर्मावर जे ते ज्ञान वाटालते. त्यात एकांनी सांगिटलं कि एक महाराज मोठे चमत्कारीक आहेत, आणि ते नेहमी खाली मान घालून असतात, एखाद्याकडे जर तोंड वर करून पाहीलं तर त्याचं नशीब फळफळतं.
मग त्याला जोडूनच एकांनी सांगिटलं कि, महाराज हे गूजरात कि कुठंतरी होते आणि समोरून जनावरांचा कळप येत होता तर तो त्यांना पाहून बाजूने निघून गेला.
मूळात त्या महाराजांच्या जागी तुम्ही मी कुणीही असतं तरी ती बापडी जनावरं, बाजूनेच गेली असती. सहसा जनावरं माणसाच्या नादाला लागत नाहीत. ९ डिसेंबर 2021
आज जो गवा कोथरूड भागात आलता त्याच्याबद्दल माणसं कशी वागली ?
त्यातल्या बघणाऱ्या लोकांनी, त्याच्यामागे मोबाईल धरून पळणाऱ्या लोकांनी त्या मुक जनावराचा जीव घेतला.
मॉब लिचींगही असंच असतं. एखाद्या धर्माचा, विचाराचा, जातीचा जमाव असतो आणि आपल्या विरोधातल्या एकाला मारून टाकतो. आजचं लिचींग हे माणूसकीचं होतं.
त्याच्या मरणानंतरही लोकसत्तासारखी विकृत जमात त्याच्यावर तयार झालेले मीम पसरवतीय. त्या गव्याभवती गर्दी गोळा करणाऱ्यात सर्वाधिक मोठा वाटा, माध्यमांचा आहे.
टिप्पण्या