धन्यवाद हागायला बसलेल्या माणसा...!

लहानपणी आम्ही दोनचार दोस्त टेकडीवर बोंबलत हिंडत असायचो,

 कोण पहिला टेकावर चढतोय,

 कोण बुड घसटत खाली लवकर येतोय

 यावर पैजा भांडणं वगैरे लागत. 

मला त्यावेळी वाटायच कि आपण चिक्कार ताकत वगैरे कमवून प्रसिद्ध डाकू वगैरे होऊ.

 असा निश्चय मी मनातल्या मनात करत. 

एकदिवस संध्याकाळी अशाच विचारात मी बळ एकवटून टेकूड चढलो. 

तर त्या टेकडीवर एक माणूस टमरेल पुढं ठेऊन बिडी वढत निवांत हागायला बसलाता. 

ते बघून मी डाकू वगैरे होण्याचा विचार सोडून दिला. 

 धन्यवाद हागायला बसलेल्या माणसा...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं