वीरप्पा मोईली : साहित्य अकादमी

काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री मा. वीरप्पा मोईली यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांनी जैन धर्माचे भगवान बाहूबली यांच्या जीवनचरित्रावर 'श्री बाहूबली अहिंसादिग्विजयम' हे महाकाव्य रचलं. या त्यांच्या साहित्यकृतीला साहित्य अकादमी मिळाली. 

वीरप्पा मोईली यांचं वय ८० आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, पर्यावरण मंत्री, विधी आणि न्याय मंत्रालय अशा खात्यांचा कारभार सांभाळलाय. विशेष म्हणजे ते कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्रीही झालेत. 

राजकारण म्हणजे मुर्ख लोकांचा अड्डा, दहशत गर्दी, काहीच न कळणारे लोक असा समज असतो मात्र वीरप्पा मोईली त्याला अपवाद ठरतात. भगवान बाहूबली हे जैनधर्मीयांतील एक धगधगतं वादळ आहे. त्यांच्या जीवनावरती काही लिहणं ही एवढी सोप्पी गोष्ट नाही. त्यासाठी भरपूर वाचन मनन चिंतन लागतं. वीरप्पा मोईली सांगतात कि ते रोज या लिखाणासाठी, संशोधनासाठी तीन ते चार तास द्यायचे. तेव्हा हे महाकाव्य साडेतीन वर्षांत पुर्ण झालं. 

बाहूबली भगवान म्हणजे जास्तीत जास्त रवींद्र जैन यांचं बाहूबली भगवान का मस्तकाभिषेक हे एवढंच माहीत असतं. पण बाहूबलींचं चरित्र अभ्यासणारा असा कुणीतरी नेता आहे. हे लक्षात यायला वेळ लागतो. 
जैन साहित्याचे रेफरन्स शोधणे, शब्दांचा अर्थ लावणे हे महाकठीण काम होऊन जातं. आचार्य श्री विद्यासागर महाराजांनी रचलेलं आणि ज्ञानपीठानं प्रकाशित केलंलं 'मूक माटी' वाचताना अनेक शब्दांचे अर्थ लागत नाहीत पण त्याला तोड म्हणून मुनी निर्वेगसागर यांनी लिहलेलं संक्षिप्त मूक माटी वाचताना त्यातील शब्दांचे अर्थ लागत जातात.

राजकारणात असणारा एखादा माणूस असं परिश्रम घेऊन काही रचतो ही मनाला आनंद देणारी गोष्ट आहे. वीरप्पा मोईली यांचे अभिनंदन ! 

Veerapaa Moili

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?