वाचकांचे प्रकार

एकेक लोकांना जीवनाचा प्रचंड कंटाळा येतो. आणि ते अचानक पुस्तक वाचनाकडे वळतात. त्यांना असं वाटतं कि शरद पवार वाचतात, शाहरूख वाचतो, अंबानी वाचतात किंवा जिल्ह्यातील काही आमदार खासदार वाचतात म्हणून आपण पुस्तकं वाचून तरी जीवन शोधू. अशा प्रकारचा साक्षात्कार होतो. 

मग ते काय करतात, जो कुणी वाचनारा आहे अशाला विचारतात किंवा लायब्ररी गाठतात. 

अशात एक पिंकू जोक आठवला तो सांगतो. एका बारावीत गॅप टाकलेल्या दोस्ताने गावातल्या दोन लॅबोरेटऱ्यापैकी चांगली 'लॅबोरेटरी' कुठली ? असं विचारल्याचं आठवतं. 

हां. तर हे जे वाचणाऱ्याकडे जातात, तो जरा जास्त पुढं गेला असला तर त्याचाही सल्ला अडाणचोट ठरतो. काही चांगले वाचक लोक असतात ते योग्य सुचवतात. 

आता जो लायब्ररीला जातो तो काय दिवा लावतो ? तो जेव्हां पहिल्यादिवशी लायब्ररीत जातो तेव्हा त्याला कपाटातून शिव खेरा असा नुस्ता बोलवतंच असतो. 'विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर , ते वेगळ्या पद्धतीने'  अशी एकच लाईन असते आणि या पठ्ठ्याला पहिल्या दिवसातच आणि पहिल्या पुस्तकातच यश गावलेलं असतं. शिव खेरा सक्सेसफुल ठरतो, तो त्याच गिऱ्हाईक करतोच. 

शिव खेरा किंवा तत्सम मोटिवेशनवाल्यांचं हे गिऱ्हाईकच असतं. 

जर हा पुस्तकवेडा होतकरू बारावी पास किंवा डिग्रीदरम्यानचा असला तर ते गिऱ्हाईक आपल्या नांगरे सरांचं असतं. नांगरे सर पुस्तकाच्या कव्हरवरून त्याच्याकडे बघतात आणि हा पठ्ठ्या तिकडे जाऊन सालूट ठोकतोच. 

दहावीच्या सुट्टया पडल्या असतील आणि लायब्ररीवाल्यांनी नुकत्याचं गावात पामप्लेटा वाटल्या असतील तर हा सोन्या तिथं जातो. 
सोन्या काय वाचतो ? सोन्याचे नुकतेच मिसरूड फुटलेले असते. हा जर एकांतात लायब्ररीत गेला असेल तर अजब पब्लिकेशनच्या ८०-१५० पानी कादंबऱ्या वगैरे वाचण्याची दाट शक्यता असते. 

जर त्याच टायमाला एखादी वर्गमैत्रीण सोनी वगैरे आली असेल तर हा आपला सोनु थेट 'ओळख एमपीएस्सीची' वगैरे सदरातील पुस्तकांना हात घालतो. किंवा सदर पुस्तक उपल्बध नसल्यास टिळक नेहरू गांधी वगैरे उचलतो. 

होतकरू गावपुढारी पण युवक अभ्यासु नेतृत्व असेल त्यात आमच्या राष्ट्रवादीचा असेल तर तो यशवंतरावांचं कृष्णाकाठ उचलतोच आणि ते वाचतोच. 

नंतरून बाळासाहेब ठाकरेंची फोटोबायोग्राफी. सहसा हे पुस्तक घरी नेऊ दिलं जात नाही, ते लायब्ररीतच बसून वाचावं लागतं. मग हा त्यात साधारण जीवनातले अडीच तास रमतो. त्या फोटोत भूजबळ साहेब दिसतात. ते सेनेचे होते. मग ते ब्लर होत जातात. शिवसेना ते राष्ट्रवादी वगैरे बरंच काही पंधरा मिनीट आठवत राहतं. असं ते पुस्तक आहे. आणि त्यातले फोटोही खासच आहेत. 

पिंकी काय वाचते ? 
पिंकी साधारण 'गृहशोभिका' घेते आणि घरला येते. त्यातल्या गोष्टी वाचते दोनेक रेशिप्या करते. मग ती त्या गोष्टीतल्या पात्रागत वागाय चालू करते. 

आणि हे वरील सर्व दै. संध्यानंदचे वाचक असतातच. ☺️

क्रमशः

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?