ही दूसरी दुनिया गावोगावी वसलीय
कोरोना हा काळ भयंकर उदासवाणा असला तरी या दिवसात एक पॅरेलल दूनिया दूसऱ्या बाजूला उभा राहतीय. काहीजणांना घरीच प्यायची सोय झाल्याने लोक अत्यानंदात डुंबून जातात संध्याकाळ होईल तसं. दिवसभर शेतातंलं किंवा नोक्री करून आल्यावर लोक संध्याकाळची वेळ व्हायची वाट बघत असतात. आता घरी देखील पिऊ नका म्हणणारी बायको वगैरे लोक मवाळ झालेत. पेदाडे लोक सॅनिटायझर आणि व्हिस्की मध्ये अल्कोहोल कॉमन असतं ही थेरी पटवून देण्यात बरेच यशस्वी झालेत. त्यामूळे घरचा होणारा विरोध सायंटिफिकली यांनी झुगारून लावलाय.
या दारूच्या ओढीने हे लोक कमालीचे कुटूंबवत्सल झालेत. येताना सलाड म्हणजे उदा. काकडी, बीट फळफळाव आणालेत. दुपारभर सांडगं पापड घालायला मदत करालेत. बायकोला घरकामात मदत करण्याची लगबग सुरू आहे.
सारी कामं आवरून संध्याकाळी बायको कडून रोज व्हरायटिशीर चखणा तयार करून घेऊन हे लोक शांततेत पिऊन अत्यानंदी होत आहेत. काही लोक ईमोशनल होऊन बायकोला जूनं प्रेमप्रकरण सांगत आहेत. काहीजण आपल्या चुका गरज नसताना कबूल करत बसलेत.
एकंदरीत ही दूसरी दुनिया गावोगावी वसलीय आणि लोकं काहीतरी करून जगत आहेत ही गोष्ट महत्वाची आहे.
टिप्पण्या