नको तिथं झाडं टोचू नका

निसर्गाला अक्कल नव्हती म्हणून काय वृक्षतज्ञ तयार झाले का कळत नाही. ओसाड, उनाड मोकळ्या डोंगरांचं पठारांचं एक सौंदर्य असतं तिथं फक्त कुसळ आणि काही रानफुलं लै बारीक असतात पायाच्या बोटांच्या करंगळीच्या नखांच्या निम्म्याएवढे असतात. वाळलेली कुसळ, त्यातून सणाणत जाणारं वारं, ती एक मजाच असते. पण कायकाय लोकांनी असा काही भूरटेपणा लावलाय, कुठंही नेऊन झाडं लावालेत. निसर्गाहून हे शनिमातले कवडीचे नट शहाणे झालेत. कुठंही झाडं लावत उठालेत सुक्काळीचे. डोस्कं दुखतं आणि त्याहून आपण यांचं काही वाकडं करू शकत नाही याचं दुःख होतं. तुम्हाला पूरस्कार वगैरे पाहीजैत ना. दूसरे अनेक क्षेत्र हायीत तिथं झक मारा. पण का उगच मोकळ्या डोंगरांना संपवताय. पर्यावरण म्हणजे झाडे लावणे नाही. पर्यावरण रक्षण म्हणजे उन्हाळ्यात गुराख्यांनी पेटवलेली कूसळ लिंबाच्या काटकीने हूलून आग वणवा विझवली याचे व्हिडीओ काढणे म्हणजे पर्यावरण रक्षण नसते. ओसाड डोंगर पठारं त्यांच्या हक्काने ओसाड आहेत. निसर्गाला हवं असतं तर झाडे उगवली असती त्याने. माणसाने, आणि उगचच पर्यावरण रक्षणाचा आव आणणाऱ्या सिनेअभिनेते वगैरे लोकांनी नको तिथं शहाणपण गाजवू नये. तुमचा शहाणपणा, वृक्षसंमेलन वगैरे तुमच्या घरात करा. कुंड्यात बागा फुलवा, टमाटे, गाजर, वांगं , बटाटं वगैरे लावा. पण विनाकारण नको तिथं झाडं टोचू नका. आणि सरकारनेही अशा शनिमात दिलेलं स्क्रिप्ट वाचून शहाणपण करणाऱ्यांना मोजू नये.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?