अर्थशास्र पुस्तके
मला अर्थशास्त्र हा विषय प्रचंड आवडतो. मिळेल तिथून अर्थशास्त्राची पुस्तके जमा करणे हा माझा छंद आहे. मला अर्थशास्त्राची गोडी लागली ती माझ्या भावामूळे. तो बीए ला असताना त्याच्याकडे अर्थशास्त्राचं पुस्तक होतं. ते मी सुरवातीला वाचलं तिथून मला अर्थशास्त्रात ऋची आली.
मी नववी दहावीत असताना अर्थशास्त्राकडे दूर्लक्ष केलं होतं याची खंत वाटू लागली. मात्र जेव्हा भावाचं पुस्तक हाती आलं तेव्हा वाचताना पहिल्या दहा मिनटात झोप आली.
आणि तिथून आपण सायन्स घेऊन किती झक मारलो याचा पश्चाताप झाला. पण माणसाचं कोणतंही वय हे पुस्तकांसाठी अनुकूल असतं हे लक्षात घैऊन मी अर्थशास्त्रात स्वतःला वाहून घेतलंय.
आता माझ्याकडे अर्थशास्त्रावरील बरीच पुस्तके आहेत. मला चांगली झोप येते. त्यामध्ये अध्यारोप
स्तरछेद
नक्त
प्राधान्यक्रम
सीमान्त
व्यवहारकोश
प्राकृत
भावफुगवटागिरी
पृथःकरण
अर्थभरणा
सममुल्य
ऱ्हस्वदृष्टी
गृहीतकृत्य
क्रमवर्धिता
उत्पादनसामर्थ्य.
असे काही शब्द हे अर्थशास्त्राच्या पुस्तकात असतात. असे शब्द वाचून आपले मन न्युट्रल होऊन हळूहळू झोप लागते.
I love Economics <3
पुस्तकांइतका चांगला वैद्य नाही. बोकील काका ही निवांत झोपत असेल.
अर्थशास्त्री, बुक थेअरपिश्ट - श्रेणिक नरदे
टिप्पण्या