महाराष्ट्रातील राजकारण
राजकारण हे आज असतं आणि उद्या नसतं. मात्र ज्या पद्धतीने एकूणच राज्यात आणि देशातल्या एकेक घटना बाहेर येत आहेत त्यावरून राजकारण कोणत्या पातळीवर आहे आणि अजून ही पातळी किती खाली जाणार आहे याची कल्पना न केलेली बरी.
विधानसभा निवडणूकीनंतर अनेक नेत्यांवर तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी भाजपात जाण्यासाठी दबाव आणला होता. ही गोष्ट आता काही खुलाशांतून बाहेर पडत आहे.
देवेंद्र फडणवीस हे राजकारणातील नेता कसा नसावा याचं उदाहरण आहेत. महाराष्ट्रासारख्या महाकाय राज्याचा मुख्यमंत्री होणं ही म्हणावी एवढी बारीक गोष्ट नाही. देवेंद्र फडणवीसांना अमर्याद सत्ता हातात मिळाली. त्यानंतर त्यांनी काय केलं ? जलयुक्त शिवार कि ३३ कोटी वृक्षारोपन ? या साऱ्या वरवर दिसणाऱ्या फालतू गोष्टी आहेत. त्यांनी एकहाती हुकमशहा बनन्याचा प्रयत्न केला. त्यापोटी राज्यात कायकाय झालं ?
हे यथावकाश बाहेर येईल. विधानसभा निवडणूकांदरम्यान पोलिस खात्याचा काय उपयोग झाला ? बंदोबस्तासाठी ? फक्त आणि फक्त धाकासाठी.
स्व. विमल मुंदडा यांचे सुपूत्र अक्षय मुंदडा हे एका जाहीर सभेत आपल्या आईनं दिलेलं वचन सांगताना म्हणटले होते, 'अक्षय गरज भासली तर एकवेळ राजकारण सोड पण पवारसाहेबांना सोडू नको !'
हे त्यांनी जाहीर सभेत बोललं होतं आणि उपस्थित लोकांचे डोळे पाणावले होते. आणि विधानसभेला त्यांच्या पत्नी सौ. नमिता मुंदडा भाजपात प्रवेश करतात ?
हे मुंदडांचं उदाहरण सांगण्याचं कारण म्हणजे दबाव कसला असेल याची कल्पना करा. कुठलंही नेतृत्व मिळाल्यावर सगळ्यात आधी माणसाकडे काय लागतो तर तो विवेक लागतो. राजकारण हे थंड डोक्यानं करायचं काम आहे मात्र फडणवीसांनी अतिघाई केली. त्यांच्या या हूकूमशाही वृत्तीतून त्यांनी सर्वात पहिला बळीचा बकरा नाथाभाऊंना केलं. तिथून एकेक लोक हेरून त्यांचा फडशा पाडायचंच काम त्यांनी केलं.
मधूकर पिचड साहेब राष्ट्रवादीकडून मंत्रीपदी तर होतेच पण त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे ते या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षही होते. ही सारी लोकं अशी सहजासहजी पवार साहेबांना सोडून जाणारी नव्हती. पण त्यांच्याबाबतीत काय झालं असेल याची कल्पना आता जनतेला येतंच आहे.
शिवसेना प्रखर हिंदूत्ववादी होती पण त्यांनीही का लाथ मारली असेल ? त्याचं मुख्य कारण फडणवीस. फडणवीसांनी मोठ्या मग्रूरीने 'पवारसाहब का ईरा खत्म हो गया !' हे राजदीप सरदेसाईंना सांगितलं होतं ते कशाच्या बळावर. तर ते हेच होतं, पोलिस बळाचा बेछूट वापर करून छळता येईल तेवढं प्रत्येकाला छळलंय.
आजही बघा, देवेंद्र फडणवीस ना वीज बीलावर बोलतात, ना मराठा/ धनगर आरक्षण, ना कर्जमाफी काहीच जनतेच्या हिताचं ते बोलत नाहीत. CD-R , पेनड्राईव, वाझे, शुक्ला, परमवीर अशाच गोष्टी करताहेत. आणि ते निव्वळ यातंच गुंतलेत. आता हे प्रकरण उघडकीला आलंय तर किती भयानक वाटतंय ? हे हिमनगाचं टोक असेल आणि याच्या खाली बरंचसं काही दडलं असेल ?
देवेंद्र अभ्यासू अभ्यासू म्हणून टांगा मारणारा एक वर्ग आहे, त्यांनी हे लक्षात असू द्यावं देवेंद्र अभ्यासू नव्हता तर खुनशी होता. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी वेगळा मार्ग स्विकारला.
२०१९ ची लढाई ही कधीच सोपी नव्हती. एका बाजूला म्हणेल त्याला गप्पगार बसवण्याची ताकद असलेले टेक्नोसॅव्ही फडणवीस आणि एका बाजूला कशालाच काही नसणारे बाकीचे सारे, या साऱ्यात जो काही लढा पवारसाहेबांनी दिलाय त्याचं आज ना उद्या महत्व पटेल.
पवारसाहेब, आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्ररूपी अजगराच्या विळख्यातून या महाराष्ट्राची मुक्तता केली हे त्यांनी केलेले उपकार म्हणायला हरकत नाही एवढे देवेंद्र फडणवीस भयानक आहेत.
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाहीत ही मोठी सुखाची गोष्ट आहे.
२५ March 2021
टिप्पण्या