बंगाल विधानसभा : ममतादिदी आणि अमित शहा

भाजपकडे अमित शहा नावाचा अतिशय हूशार आणि तितकाच तिरक्या चाली खेळणारा माणूस आहे. 

तुम्ही एक निरीक्षण करा आपले गिरीश महाजन, आणि बरेच भाजपाचे आमदार लोक, काही पदाधिकारी बंगालात नेले होते. या प्रत्येकाबरोबर ५० लोक सहज गेले तर १००० लोक महाराष्ट्रातून असे विविध ठिकाणाहून हे लोक नेतात.ही डोकी नाहीत तर टाळकी असतात. यांची गर्दी होते आणि प्रभाव पडतो. मोठ्या रॅली दिसतात. तिथं हेच असतात. पुर्ण देशभरातले हे लोक तिथं जाऊन आपली उपस्थिती दाखवून तिथल्या जनमतांवर प्रभाव टाकतात. त्यातून तिथले मतदार गळाला लागतात. 

किल्लेकोट करून राजा बंदीस्त झाला कि उंट घोडा हत्ती प्यादे त्या दिशेने सरकवून राजाला घेरता येतं. पण ममता बंदीस्त झाल्या नाहीत. त्यांनी डाव ओळखून मुक्तपणे घोडदौड सुरू ठेवली. ममता ज्या वेगाने फिरायच्या तो थक्क करणारा आहे. पवार साहेबांना पावसातील सभेची किंवा, दीदींना व्हीलचेअरची सहानभुती सहजासहजी मिळाली नाही. त्याआधी त्यांनी खस्ता खाल्या होत्या. 

अमित शहा नावाचं वादळ थोपवणे ही गोष्ट साधी नव्हती.
2 May 2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं