मिखाईल ताल

1959 मध्ये युगास्लेव्हिया येथे candidate tournament होती, यात अनेक नामांकित खेळाडू सहभागी झाले होते, यामध्ये मिखाईल ताल ही होता. या साऱ्यांपैकी ताल ला कोणीच सिरीयस घेत नव्हतं. 

तालची पहीली मॅच सेमीस्लोव्ह सोबत सुरू होती. तालने queen sacrifice केली. कॉमेंटेटरनी ही Sacrifice किती चुकीची होती हे सांगितलं. पुढच्या काही मुव्ह मध्ये सेमीस्लोव्ह ला रिझाईन करणं भाग पडलं. मिखाईल ताल जिंकला. 

यानंतर बॉबी फिशरसोबत तालची मॅच होती. खेळताना मिखाईल ताल फिशरला चिअरप करण्यासाठी 'बॉबी कुकु' असं म्हणायचा. बॉबी फिशरला (असताना यडझवा होता, हे माझं वैयक्तिक मत) वाटलं हे बेणं मला चिडवतंय. बॉबी फिशर हरायला पण लागला आणि रडायला पण लागला. 

दरम्यान तिथल्या खेळाडूंच्यात एक अफवा पसरली. ती म्हणजे मिखाईल ताल हिप्नोटाईज करतो आणि समोरच्याच्या डोळ्यासमोर नागवी बाई येते आणि ती लक्ष विचलित करते. म्हणून काही खेळाडूंनी गॉगल घालून तालच्या विरोधात खेळ खेळला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तालने ही स्पर्धा जिंकली. 

रिगामध्ये जंगी स्वागत झालं. 

पुढे जाऊन त्याला बोटवोनिक बरोबर चेस खेळायची संधी मिळाली. तो दिवस उजाडला. बोटवोनिक ताल यांची मॅच मॉस्कोमधील पुश्किन थेटरात लावली. खचाखच गर्दी झाली. बोटवोनिक लैच कॅलक्युलेशनवाला गडी वय वर्षे ४९ तालपेक्षा कितीतर पावसाळं जादा बघितलेला माणूस. तो अगदी वळंबा लावून पिस पुढे ढकलायचा. मिखाईल ताल आडवंतिडवं खेळायचा. बोटवोनिकला कळायचं बंद झालं. तालने बोटवोनिकलाही पराभूत केलं. 

मिखाईल ताल हा आम्हा आडव्यातिडव्या लोकांसाठी आदर्श आहे. धनुष्यातून डोळं झाकून काच्चदिशी बाण सोडावा. जाऊन लागेल तिथं लागेल, गोल त्या बाणाभोवती करण्याचं काम मात्र न चुकता करावं. 
Happy Bday MISHA <3 
#MagicianFromRiga


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

पावसाचं आवाज कसा येतं