महापूर आणि नुकसानभरपाई

आमच्या शिरोळ तालुक्यात गेल्यावर्षी आलेल्या महापूरात मोठ्ठं नुकसान झालं. त्यामध्ये अनेकांची घरं पडली. सरकारने कोट्यावधींचा निधी दिला. त्याच्या वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप एका संघटनेने केलाय. 

त्यांच्या म्हणण्यानुसार ज्याचं घरच पडलं नाही त्याला ९५ हजार रूपये दिले गेलेत. तसेच ज्यांचं नुकसान झालंय त्यांना त्याचा काहीच लाभ मिळाला नाही. असा आरोप त्या संघटनेने केलाय. 

आता मजेशीर बाब अशी कि, याची जरी चौकशी करायची म्हणटली तरी गेल्यावर्षी किती नुकसान झालं होतं ते यंदा मोजायचं तरी कसं ? 

सदर संघटना गेल्यावर्षी हा प्रकार होत असताना नेमकं काय करत होती ? 

गेल्यावर्षी अनेकांचं बरंच मोठ्ठं नुकसान झालंय. त्यात त्यांना ९५ हजार मिळाले असतील तर कुणाच्या पोटात दुखण्याचं कारणच काय हे समजत नाही. अधिकाऱ्यांवरचे आरोप सिद्ध होतील न होतील तो पुढचा भाग आहे. मात्र यात मदत मिळालेल्या लोकांचे पैसे परत जाणार आणि मजा होणार. 

गेल्यावर्षीचा महापूर आणि यंदाची अतिवृष्टी यात शेतकऱ्याच मोठ्ठं नुकसान झालं आहे.२००४ च्या कर्जमाफीच्या दरम्यान अशीच मजा एका नेत्याने केली होती आलेले पैसे परत गेले.

 नुकसान कुणाचं  ?   शेतकऱ्याचं. 

आताही चौकशी बसली तर हजारो शेतकऱ्यांचंच नुकसान होणार. 

देशाचे हजारो कोटी बुडवणारे मस्त राहीलेत आणि या बिचाऱ्या शेतकऱ्यांना ९५ हजार मिळाले तर या प्रामाणिक संत माणसांच्या पोटात दुखू लागलं. काय न्याय आहे राव. 

उलट जे वंचित आहेत मदतीपासून त्यांच्यासाठी मदत मिळवण्यासाठी जोर लावा. यात इकडून आणि तिकडून शेतकऱ्याच्या मानेवरच कुऱ्हाड चालवायची असेल तर खुशाल चालवावी. 

कर्जमाफी वेळी परत पैसे गेल्याचा अनुभव पाहता यावेळेसही हजारो शेतकऱ्यांना घोडा लागणार यात शंका नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?