रोझ डे
आमचा एक दोस्त हाय, त्याची एक गर्लफ्रेंड होती. हे बेणं म्हणजे अतिउत्साही. लोक रोझ डे ला एखादा पाचदहा रूपयाचा गुलाब घेत्यात. हे बेणं मला २०० रूपयचं अख्खा गुच्छचं घेटलं. सांगलीला आम्ही सर्व लोक शनिमा बघाय गेलतो. ह्यानं जयसिंगपूरातंनं घेटलेला गुच्छ सॅकमधनं सांगलीतल्या एसेफसी मॉलमध्ये नेलता. तिथं ह्या पठ्यानं तिला ह्याह्या करत गुलाबाचं गुच्छ दिलं. ती बी बिचारी खुश झाली. सदर दोस्ताने स्वखर्चाने शनिमा दावला. जेवण दिलं मस्त मजा आली. नंतरनं त्यच्या गर्लफ्रेंडनं हाय तसा गुच्छ ह्यला दिला. हे परत सॅकमधे घालून आणलं. माझ्या डोकीत विचार आलता. जराउगच पाणी शिपडून त्यो गुच्छ परत फुलवाल्याला निम्या किमंतीत विकावा. पण शेवटी म्हणटलं एवढा खरोखरचा शनिमा दाखवला, ह्याचाबी शनिमा दिसला, त्यातंनं परत त्यो गुच्छ विकणं म्हणजे लै हरामीपणा होईल ह्या हेतूने मी मन मारलं. पुढं दोघांचीही काशी झाली. ह्या सगळ्यात चान्स मारला त्यो फुलवाल्यानं.
टिप्पण्या