आजोबांसाठी तो धक्का असावा.
मी आपला गाडीवरनं चाललोतो,
माझ्यापुढं होती एक्टिव्हा ,
त्या एक्टिव्हावर एक ६५-७० वर्षाचं धीट म्हातारं बसलंतं आणि गाडी ताणालतं नुस्तं, अजिबात म्हातारपणाची भिती नाही कि काय नही.
म्हातारं पुढं मी मागं, चांगलं १० मिनटं आमची रेस चाललीती.
एकदमच म्हातारं यडबाडलं आणि गाडी स्लो आली ,
आणि पद्धतशीर माझ्या आडवं आली गाडी, मी थोडक्यात चूकवली,
पण हे म्हातारं का यडबडलं ? याचा शोध मी दोनेक सेकंदात लावला,
कारण असं होतं त्याच्यापुढनं स्किनकलर ड्रेस घालून एक पोरगी पलिकडच्या साईडनं चाललीती. मी पण बारिकमध्ये यडबडलो, पण दूसऱ्या मिलीसेकंदात मी थाऱ्यावर आलतो. आजोबांसाठी तो धक्का असावा. 😊
टिप्पण्या