शेतकऱ्याची सक्सेस ष्टोरी
एखाद्या शेतकऱ्याची सक्सेस ष्टोरी पेप्रात आली तर त्याचं कात्रण काढून ठेवा आणि मोजून पाच वर्षात त्याच्या परिस्थितीचा एकदा आढावा घ्या. तुम्हाला शेती म्हणजे काय असते हे समजून जाईल.
अनिश्चित वातावरण, परराष्ट्रात निर्यातीला मर्यादा, देशांतर्गत व्यापारातही बोंब. जरा कांदा महागला कि थेट शत्रुराष्ट्रातून आयात करून दर पाडले जातात. फुल शेतीत कोट्यावधींची गुंतवणूक करून बोंबलत बसलेले लोक दिसतात.
मग अशी बोंब मारली कि, तुम्हाला शेती करायची अक्कल नाही वगैरे सांगून धडाधड सक्सेस ष्टोरी तोंडावर मारली जाते. ऐकून घ्या फक्त.
वाढलेले खतांचे, बि-बियाण्याचे दर यावरून देशी बियाणे सेंद्रीय शेतीवाले आपले अभ्यासवर्गाच्या छावण्या गावोगाव टाकतील कूठं काय करायचं, कितपत कोणती गोष्ट व्यवहार्य आहे याचा आढावा घेतल्याबिगर कुठलंही धाडस करायला जाऊ नका. आज रोजी बचत हीच मिळकत आहे एवढं लक्षात राहू द्या.
टिप्पण्या