राहूल गांधी
राहूल गांधीने सकाळपारी केरळात मासेमारी केली, समुद्रात पोहला. तो म्हणतो कि माशांसाठी समुद्रात फेकलेलं जाळं जेव्हा वर ओढतो आणि ते रिकामं वर येतं तेव्हा जी निराशा होते ती मी समजतो. राहूल हा राजकारणी माणूस नंतर असेल पण त्याआधी तो माणूस आहे. जगात एक बाजूला सकारात्मकतेचा भडीमार, आंत्रप्रेनर , मोटीवेशनल, सारंच्या सारं कृत्रिम होत असताना, राहूल उदासी, खिन्नता, निराशा हे न डगमगता बोलतो त्यातून त्याचं माणूस असणं दिसतं. बाप मारला, आज्जी मारली, आईवर घाणघाण शब्दात शेंबडी पोरं ते म्हातारेही बोलतात, निवडणूकीत सततच अपयश येत असतं, त्यालाही तिन्हीसांजा, रात्री आपल्याहून दुप्पट खायला उठत असतील. पण पठ्या बिनघोर आहे. हे आवडतं आपल्याला त्याचं. <3
टिप्पण्या