शांत : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे हा माणूस दिसताना साधाभोळा, शांत वगैरे वाटतो. पण मूळात अतिशय चतूर माणूस आहे. 

फडणवीसांनी अख्खी पुण्यातली मंडळी स्वतःवर फुलं उधळण्यासाठी ठेवली होती. तसं उद्धव ठाकरेंनी स्वतःची इमेज तयार करण्याची काळजी घेतली नाही. 

त्यांना पुर्णतः जाणीव आहे कि हिंदूहृदयसम्राटांची ही मिळकत आहे. ती अतिशय जाणीवपुर्वक जोपासायला हवी. त्यांनी ती जोपासलीही आणि वाढवलीही. 

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांनाही उतारवयात कळून चूकलं असेल कि राजकीय जीवनात आक्रमकपणा कामाचा नाही तर शांत बुद्धीनेच राजकारण वाढत असतं. या जाणीवेतून त्यांनी राज ठाकरेंच्या भोवती गर्दी असूनही उद्धव ठाकरेंना पुढं आणलं. 

उद़्व ठाकरे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याबद्दल जनतेत एकप्रकारची सहानभुती आहे. ती देवेंद्र फडणवीसांना कधीच मिळाली नाही त्याला त्यांचा मी पणा कारणीभूत ठरला. 

कालच्या भाषणात कोंबडी सोलावी तसं भाजपाला सोलून काढलं. एकतर उद्धव ठाकरेंचे हात कोणत्याच दगडाखाली अडकून नाहीत. त्यामूळे ते तलवार उपसून लढालेत. 

मर्द, तलवार, मनगट, मावळे हे त्यांचे नेहमीचे शब्द आहेत. मात्र काल रावसाब दानवेंचा बाप त्यांनी दाखवून दिला.

आज सकाळपासून बघितलं तर राणेंपासून, केश्या उपाधे वगैरे इवळत बसलेत त्यांना सध्या कुणी विचारत नाही. 

उद्धव ठाकरेंनी नवे किती उद्योग यायलेत याचीही कल्पना दिली. मोदीसरकारचा करोनाकाळातील राजकारणाचाही समाचार घेतला. त्यांना खरा राग कशामूळे आलाय तर आदित्य ठाकरेंची बदनामी जी भाजपांने केली त्याचा राग खदखदतोय. भाजपने फडणवीसने कितीही बोंबा मारल्या तरी येणाऱ्या काळात सरकार पाच वर्षे अजिबात हलणार नाही याची काल शाश्वती मिळाली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?