महादूचे पराक्रम
कुठं ते नेमकं आठवत नाही, पण आम्ही एकदा बोटीनं समुद्रात गेलतो काय नदीत गेलतो. तर तिथं बाटलीत एक आपलं आणि आपल्या प्रेयसीचं नाव लिवलेली चिठ्ठी टाकायची. आणि बुच्च लावायचं. आणि ती बाटली फेकायची. मग प्रेम सक्सेसफुल्ल होतंय. असं कायतर लडतर होती. तर सदर ठिकाणी मी असा घाणेरडा प्रकार केला नव्हता. हे आठवायचं कारण म्हणजे महादू आपलं फोटो आंत्राळात पाठवालंय, उपग्रहातनं.
ह्याला बघून वरनं एलियन आपलं टूल किट घेऊन येत्यात.
टिप्पण्या