जगन रेड्डी-हेमंत सोरेन

हेमंत सोरेनने मोदींवर ट्विट करून टीका केली.  हेमंत सोरेन म्हणटला, मोदींबरोबर फोन झाला, त्यांनी कामाच्या गोष्टीऐवजी स्वतःच्या मनाच्या गोष्टी झाल्या. हेमंत सोरेनचे ट्विट माध्यमांनी उचलून धरू लागताच. वाय. एस. जगन मोहनला चटका बसला, लगेच त्याने हेमंत सोरेनला पंतप्रधानांवर अशी टीका करू नको असा शहाणपणा शिकवला. 

आता मोदींवर सोरेनने टीका केली त्याचवेळेला सोरेन आणि गडकरींची एक व्हिडीओ क्लिप बाहेर आली ज्यात गडकरी सोरेनला डंके की चोट पर सांगताहेत तुम्ही कोटेशन द्या, चांगले अधिकारी द्या जगात भारी रोड करून तुम्हाला देतो. 

मोदींवर टीका होते तेव्हाचं गडकरी- सोरेन यांच्या संभाषणाचा व्हिडिओ समोर येतो. तरी भाजपचे कुणी सोरेनवर टीका करायला पुढे येत नसतात. तेव्हा जगन मोहन का पुढे आला असा प्रश्न येतो ? त्याने का हेमंत सोरेनला शहाणपणा शिकवावा ? 

तर त्यातला कार्यक्रमाचा भाग असा आहे कि जगन रेड्डीने गेल्यावर्षी सप्टेबर अॉक्टोबरच्या दरम्यान तत्कालीन CJI बोबडे यांना पत्र लिहून सध्याचे CJI एन. व्ही रमना यांच्याविरोधात तक्रार केली होती. आणि आता रमना CJI आहेत. मोदीजींचा पुळका असा सहजासहजी जगनूला आलेला नाही आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?