जय गूरूदेव ! 🙏

आमच्या अकरावी बारावीच्या सायन्स वर्गाला एक मास्तर फिजिक्स शिकवत होते. सहज आज सकाळी त्यांचा फेसबुक प्रोफाईल बघण्याचा योग आला. 

तर हे आमचे फिजिक्सचे मास्तर इस्त्राईल बरोबर ष्टँड झाल्याचा डीपी लावलाय. माझी उत्सुकता चाळवून जाऊन या मास्तर महोदयांचे पराक्रम बघण्याचा मूड झाला. 

हे आमचं मास्तर डिमॉनिटायझेशनला सपोर्ट केलंय, डिजिटल इंडियाला सपोर्ट केलंय. भक्त जे जे म्हणून खातात तो तो चगळा, कडबा, भरडा या मास्तर महोदयाने खाऊन रिकामा केलाय.

आणि आत्ता ईस्त्रायलबरोबर ष्टँड झालाय. ह्या मास्तरच्या लेक्चरला मी जादातर झोपा काढलोय, नाहीतर लेक्चर बंक केलोय, आणि जागा असल्यास याने शिकवलेलं काय मला कळलं पण नाही. याचं समाधान वाटलं. काही गोष्टी आपल्या नकळत चांगल्या होतात त्या अशा. 

जय गूरूदेव ! 🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?