तयारी 2024 लोकसभा निवडणूकीची

राज्याच्या राजकारणातून बाहेर येऊन भाजप विरोधी पक्षातील लोकांनी
२०२४ साली जी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याच्या तयारीला आजरोजी लागायला हवं. आजवरचा विरोधी पक्षांचा लोकसभा निवडणूकीच्या नियोजनाचा कारभार अतिशय गचाळ आहे. कोणतंही नियोजन नसताना मोदी शहाला केंद्रात आव्हान देण्याचं स्वप्न कुणीही बघू नये. 

लोकसभा निवडणूक डिक्लेर झाली कि, उमेदवारांची शोधाशोध चालू होते. शेवटच्या क्षणापर्यंत कोण उमेदवार हेच जाहीर होत नाही. तोवर मोदी शहा घोषणा देत रोज चार राज्य पिंजत असतात. 
एकतर हे जूने लोक प्रस्थापित अजिबात दिल्लीला जायला तयार नसतात. त्यांना महाराष्ट्रातंच इंटरेष्ट असतो. निरीच्छेने तिकीट घेतात आणि आनंदाने उताणे पडतात. यापेक्षा ज्या लोकांचा फोकस क्लिअर आहे त्यांना किमान अडीच वर्षे आधी उमेदवारी डिक्लेर करावी आणि मतदारसंघ पिंजायला सोडावं. तरच कुठंतरी निभाव लागणार आहे. 

हे जे भावी खासदार आहेत त्यांना महिन्या दोनमहिन्यातून एकदोन दिवस संसदेत काय चालतं याचं प्रशिक्षण देण्यात यावं. उदा. Ncp मध्ये सुप्रियाताई, सेनेत संजय राऊत यांनी त्याची जबाबदारी घ्यावी. 

लोकसभा मतदारसंघ हा तुलनेने मोठ्ठा असतो सगळीकडे पोचता येत नाही उमेदवाराला. तिथे लाट काम करत असते. पण या लाटेला थोपवायचा एकमेव मार्ग म्हणजे मतदारसंघ बांधणे हाच होय. 

दहा वर्षातल्या अपयशातून सर्व प्रादेशिक पक्ष धडा घेतले असतील तयारीला लागतील. अन्यथा मोदीशहा परत तुमच्या आमच्या उरावर बसणार हे ध्यानात घ्यावं या ठिकाणी. 

या बाबतीत डॉ. सुजय विखे यांचं उदाहरण बघता येईल. विखेंनी मतदारसंघ पिंजून काढला. ऐन निवडणूकीच्या तोंडावर पक्ष बदलला तरी त्यांच्यासोबतचा मतदार हलला नाही. परिणामी लाखाने निवडून आले.

लोकसभेचे उमेदवार जे दलबदलू ठरणार नाहीत अशांना ताकद संसाधने पूरवून आजच तयारीला लागायला हवं. नहीतर आयेगा तो मोदीही !

4 may 2021

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?