माणसा परीस कुत्री बरी

माणसाने माणसाळावलेला पहिला प्राणी म्हणजे कुत्रा. आजही आपल्या जवळचा म्हणजे तोच. कुत्रा माणसाळला, मदत करु लागला, राखणीला आला, शिकारीचा माग काढून दिला, छोटी शिकार करून दिली. भलताच तो माणसाळला पण बोलता बोलता माणूस एकमेकाला कुत्र्या, कुत्र्यासारखं मारीन, कुत्र्याची लायकी, कुत्रा तो कुत्राच असं काही द्वेषाने भरभरून बोलतो तेव्हा ते काय बघू वाटत नही. काय माणूस काय करत चाललाय हे त्याच्यापण लक्षात येत नसतं. 
उलट कुत्रा (पाळीव) हा मायाळू असतो, प्रामाणिक इमानदार असतो हे बव्हतांशी गुण माणसात नसतात. 
एखादा धनगर जेव्हा शेकडो जनावरं चरायला घेऊन भटकत असतो तेव्हा एकदोन कुत्री असल्याने किती बिनधास्त असतो. रात्री जर दरवाजाबाहेर कुत्रा बांधलेला असेल तर सुखाची झोप लागते. तो भलेही चोर दरोडेखोरांचा प्रतिकार करू शकत नसेल, पण सुचना करतो माणूस सावध होतो. 
कुणाच्या घरी जर कुत्रा असेल तर तो कुत्र्याचा अनादर करणार नाही. घरात जर बाहेरून तुम्ही आलात , परगावाहून जर बऱ्याच दिवसांनी आगमन झालं तर त्याला एवढा आनंद होतो किंवा तो तुम्हाला एवढा मिस करत असतो जेवढे घरातले इतर कोण करत नसतील. 
किंवा घरातले व्यक्त करु शकत नसतील. पण हा गडी बिनधास्त अंगावर उडी घेऊन पायांनी अंगाला मिठी मारतो त्या मिठीत काय आनंद असतो ते ज्याचं त्यालाच माहीत. 
हे हुशार तर असतातंच. त्याने माणूस भारावून जातो. आमच्या पुर्वजांना कुठतरी ह्या कुत्र्यांनी मोठ्ठी मदत केलीय त्याची परतफेड आज काही लोक त्यांना ऐशोआरामीचं जीवन देऊन करालेत. ऐशोआराम म्हणताना त्याला माणसाच्या दृष्टीने बघू नका. आज उपचार उपलब्ध झालेत, वेगवेगळी औषधं बाजारात मिळतात, त्यांच्यासाठीच्या खेळण्या, त्यांना सुखावह असं खाद्य आज भरपूर उपलब्ध झालंय. ह्या प्रेमावर ती बाजारपेठ तयार झालीय. त्याचा फायदा उद्योगपती लोक घ्यायलेत , घेऊ देत हरकत नाही. 
कुत्र्यांना हे मिळालं पाहीजे ते त्याचे हक्कदार आहेतच. 
शेतं राखलीत, हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण केलं, आपल्या इथवरच्या प्रवासात त्यांचा सहभाग नक्कीच आहे. 
बरं ह्या बारक्यांना तुमचा मूड लगेच कळतो. तुमचं तोंड बारीक झालं असंलं तर हे जवळ येणार किंचित अंग घासून आपल्याकडे न बघता दुसरीकडं बघून हे लोक एकदम सुतक आल्यासारखं तोंड करून बसतात. आपण बोंबलत ह्याला काय आपल्यापेक्षा दुःख झालंय म्हणून चौकशीपोटी बोलवतो तर ते अजिबात प्रतिसाद देत नहीत. अजिबात बघत नही, मग जवळ जाऊन गोंजारावं तर झिडकारून आणि जरा ताठूनच बसतो गडी. त्याला काय झालंय ह्या नादात आपण आपलं दुःख, टेन्शन विसरून त्याचा मुड तयार करायला जातो बरंच झेलल्यावर मग हा गडी शिस्तीत तसल्याच मूडच्या तोंडानं चाटतो, मग आपल्याला बरं वाटतंय. आपण हसूखेळू लागलो कि मग ह्याची शेपटी हलायला लागते. मग हा बरीच सलगी करतो. लाडात येतो. आपण दुसऱ्या कामाला लागतो तो पण हुंदडत कुठंतरी जातो. पण ही वेळ टेंशन हाणून नेण्याचं काम त्याचं असतं. तो त्यावेळी आई, प्रेयसीएवढा जवळचा होतो आणि आपल्याला बालपण देतो. 
तेच माणसांच्याबाबतीतपण असतं त्याचं. आपल्या घरी एखादी बाहेरची व्यक्ती पहिल्यांदा येणार असेल तर ह्याचंच काय ती लुटायला आलीय असं समजून भुंकतो. अंगावर जातो. मालक जवळ असला तर मात्र त्याला काय करत नाही. तो कुठंतरी निरीक्षणं नोंदवत असतो कि, ह्या व्यक्तीचं आणि आपल्या मालकाचं रिलेशन काय असेल ? त्यांची किती जवळीक असेल हे तो नोंदवून ठेवतो. मग त्यावर त्याची पुढच्यावेळच्या आगमनानंतरची एक्शन डिपेंड असते. 
जर ती तुमची प्रेयसी असेल तर हा जागी बसून असणार, फारतर एक किमंत देत नसल्याची नजर टाकूनशेपूट हलवेल, कदाचित त्याला वाटत असेल कि ही बया मालकाला काय फुस लावून जात्या आणि हा ईकडं फिरकत नही. हे मात्र त्यांच्या मनाला लागतंय. म्हणून एक तुम्ही मात्र लक्षात ठेवलं पाहिजे कि, कुणीही व्यक्ती घरी आली, बसली, राहीली त्यानंतर ती गेली कि पहिला ह्याला जाऊन गोंजारा नहीतर तो चारदिवस तुम्हाला भिक घालत नसतो. तुमच्या हातनं भाकरी देखील तुमच्यासमोर तो खात नाही. असं हे लै इमोशनल करतात. 
आता खरी मज्जा बघा. तुमचे शेजारपाजारचे लोक त्यांचं तुमचं रिलेशन काय असतं त्यावरच त्यांच्या कुत्र्यांवर ह्याच रिलेशन ठरत. हे खेळायला जातात तेव्हा ह्यांचाही ग्रुप होतो मात्र तेही आपल्या मित्राच्या कुत्र्याबरोबरच. तुमचे आणि एखाद्याचे रिलेशन बरे नसेल तर तो त्याच्या कुत्र्याकडे जात नही, किंवा त्यांचेही वैर होते.
हे त्यांना कळतं. ते हुश्शार असतात. जीव लावतात. जीव देतात. मायेने, लटक्या रागाने, अंगाखाद्यावर लोळण्याने जवळचे करून सोडतात अगदी जवळचे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कंडका पाडायला कोयता धारेचा लागतो!

हातकणंगलेत राजु शेट्टींविरोधात कोण ?

कोल्हापूरातील दोन दोस्तांच्या सरकार आणि समाजाने केलेल्या हत्या!