टाईमपास कसा करावा ?


वेळ ही आत्यंत अनमोल गोष्ट हाय आणि झक मारत ते खरं सुद्धा हाय. तरीपण कायकायवेळेला विनाकारण निराश वाटते. ते आगदी शिवखेरा ची पूस्तक वाचलं तरीबी निराशा जात नही. मला आगूदर शिवखेरा लै आवडायचा. आता ते पुस्तक आणि माहेरची साडी हे मी अत्यंत विनोदी असं वाटून वाचतो बघतो. जीवन गतिमान हाय तिथं आजचं वास्तव उद्याची खिल्ली असत्या. पटत नसलं तर एकदा ईचार करा. त्यातून निराश वाटलं की मी काही ऊपाय योजून काढलो. ते सकाळ ते रात्री झोपेपर्यंत आखंड दिवस कसा टाईमपास करता येईल. हे माझ्या डोशक्यात आलं नव्हतं.
सकाळी भल्या पहाटे ऊठावे. आवरावे. आवरताना टाईमपास करू नये. आवरून माॅर्निंग वाॅकला जावावे. सूंदर मुली कमी असतात हे मान्य. पण त्यातल्या त्यात ज्वाला गूट्टासारखी एखादी दिसतेच. तिच्या प्रेमात पडावे. पडले तरी लै लागत नही. जाड पोरी मायाळू असतात. बीपी, शुगर, हार्ट असले प्राॅब्लेम असलेले कैक काका लोक असतात. त्यांच्याबरोबर चालत बोलत जावे. ऊगचच कायवाट्टलं ते इचारावं. सकाळसकाळी त्यास्नी पण कोण बोलायला नसतंय. त्यामुळं ते अधिक बोलत्यात. आणि लांब थापा मारत्यात. ते ऐकायला मज्जा येते. माॅर्निंग वाॅकहून परत येताना आठला ऊठणार्या मित्राच्या घरी जावावं. ऊठलाय काय असं ईचारलं की त्याच्या घरातले त्याला शिवा घालतात. आणि आपलं कौतूक करतात. असं कौतूक ऐकताना मज्या येतंय. वरंन फूकटचा चहा मिळतोय. मित्र नंतरनं शिवा घालतोय हा भाग वेगळा.
सकाळी एवढं कौतूकानं प्रोत्साहित झाल्यावर तोंडावर ऊकळ्या फूटलेल्या दाकवल्या तरं घरातली पण कौतूक करत्यात आणि कामाला लावत्यात. त्यापेक्षा ऊकळ्या आतच ठेवून एंजोय करत. तोंडावर दमलेला भाव आणावा. पेपर येत असला तर वाचावा. नहीतर कुणाकडून तरी आणावा. जास्तीजास्त पुढारी पेपर कसा मिळेल ते बघावं. माझी एक इच्छा हाय प्रतापसिंव जाधवांबरोबर फोटू काढून घ्यायची. विशेषतः पहीला च्या आणि विश्वसंचार वाचावे. मज्जा येते. विचाराला आंतरराष्ट्रीय धार येते. एक शिशपेनसील घिवून पेपरात आलेल्या चित्राना दाडीमिशा काढाव्या. एकसप्रेसला चित्र चांगले येत्यात.
त्यानंतर खरोखर दाढी करायला बसावे. (पुरूषानी). दाढी करताकरता एफेम ऐकावे आठवाजता आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदी इंग्लीश मराठी सलग बातम्या असतात. दाढी करणे हा चांगला टाईमपास असला तरी दाढी कोरणे हे कौशल्या हाय. त्यामुळे दाढी वाढवावी. आणि कोरत बसावे. तूरटी आफ्टरशेव लावावे.
मग तोंडाला फेसवाश लावून आपन गोरं होत हाये असे वाटते. मग पावडर लावावी. आणि एकदा बोंबलत हिंडून यावे.
आंघोळ हा एक भारी टाईमपास हाय महादेवच्या पिंडीवर कसं एकटाक पाणी पडतंय. तसंच डोश्कीवर एकटाक धार धरावी. ऊशेरपर्यंत. नाकात पाणी गेलं की मज्या येते.
आंघोळनंतर घरात जामपैकी नाष्टा हादडायचं. जाताना डेटा कनेक्शन असेल तर व्हाटसपवर तमाम पोरींना hiiiiii असा मेसेज टाकून द्यावा. आणि डेटा बंद करून घरातंन बाहेर पडावं. मग नंतर एखादा दहावीची किंवा बारावीची परिक्षा दिलेलं पोरगं हूडकावं आणि त्याच्याबरोबर सूरवातला गोड बोलून नंतर विषय काढायचा परीक्षेचं आणि रिझल्टच भ्या घालायच.
गावात तुळसा, म्हाळसा, रत्ना, फूला आज्जी असत्यात त्यांच्याकडं जायचं. डबीतली तपकीर वडायची, भाड्या, हट्ट्याळीच्या असल्या सोन्यासारख्या शिवा खायच्या. गावात आपल्यागत टायमपास करणारे लै असत्यात. त्यासनी घिवून आंबं पाडायला जांभळं काढायला जायचं. झाडाखाली बसून आंबं जांभळं खायाची कुया, बिया तिथंच टाकून यायच.
शेरडं फिरवत असलेला कोणतर गाठ पडतोय त्यच्याजवळंनच पातेलं घ्यायचं एकादी शेळी पिळायच. आकरी दूध प्यायच. शेरडाचं दूध चांगलं असतंय. त्यच्याच बटव्यातल पान सूपारी खायचं नंतरनं त्यो कात नखानं टोकरून देतोय ते तोंडात बोटानं घोळवत चिमटीनं टाकायच. लाल व्हायचं.
घरातंन भाकरी बांधून घ्यायचं, किटलीत आंबील ताक कालवून घ्यायच आणि रानात जावून हायहूदड करायचं. मग तिथंच झोपायचं. एक काड्याची पेटी घिवून जायाचं दूपारला एखादं म्हवाचा पोळा बघायच. पालापाचोळा पेटवून धूपवायचा. धूर आलं की माशा ऊठून जात्यात पोळा काढायचं. पेल्यात पिळायचं. मग खात बसायचं.
नंतर डेटा कनेक्शन ऑन करायचं. सकाळी पाठवलेल्या मेसेजला ज्या पोरीचे तीनचार रिप्लाय आल्यात ती जवळची असत्या. तिच्याबरोबर चॅटींग करायचं. त्यात ती बोलवली की मग ऊशेरटाईमपास होतो.
गूगल वर जावून STD च लाँगफाॅर्म काय ?
जीभेवरचे टेस्टबड.
नटीचं लफडं.
पूतिनमामा, बराकतात्या, किमदादा काय कराल्यात ह्याचा शोद घ्यायचा.
नंतर ज्ञानेश्वरीतला एखादा अध्याय घ्यायचं आणि आपल्या शब्दात अर्थ लावायचा. नंतर भावार्थाबरोबर कमपॅरीजन करायचं. असे केल्याने बरे वाटते. रात्र झाली की चित्रं काढायची. म्हणजे ब्रशनं काढायची. फक्त रंग वापरायचे.
घरात कोण नसलेलं बघून गाण जोरात लावून डान्स करायचं. असं करत करत दिवस जातो. आणि टाईमपास हूतो.
खेळच्या खेळ हूतो आणि वेळच्या वेळ बी जातो.

टिप्पण्या

मुकेश म्हणाले…
जाड पोरी मायाळू असतात

त्रिवार सत्य

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं