नेव्ही

पौसपाणी, वढा, वगळ, नदी, समुद्र ह्या गोष्टी लहान असल्यापसंन लै आवडायच्या. सातवीत पयल्यांदा गणपतपुळ्याचा समुद्र बघिटलो. तिथंन कोकणातले अनेक किनारं हिंडलो, गोव्याचा बीच हिंडलो.
दहावी व्हायच्या अगोदर मला नेव्हीत जावं असं सारखं वाटायचं. मी कोणतर माझ्यापेक्षा मोठ्ठं भेटलं की त्याला विचारत हूतो मला नेव्हीत जायला काय करावं लागल ? माझा मामा त्यावेळी एमए ला हुता, त्याला नोकरीसंदर्भ वगैरे महित असायचं. त्यात बारावी नंतर ssbसिलेक्शन बोर्डासाठी असणार्या परिक्षेचं माहिती असायचं. पण ती परिक्षा बारावीनंतर हूती. त्यामुळं झक मारत अकरावी बारावी करणं भागच हूतं.
तरीपण एका पेपरात छोट्या जाहिरातीत मर्चंट नेव्हीत जाण्यासाठीची जाहीरात हूती. ते कोल्हापूरला होते. फोन करून विचारलो तर म्हणटले प्रत्यक्ष भेटायला या. मग भेटून आलो. ते म्हणटले अजून वय कमी हाय. मग परत ते विषय काढलो डोक्यातंन. तोपर्यंत हिकडं अकरावीला तीन विषय गेलीत आणि बारावीला दोनच सूटलेत. मराठी आणि इंग्लीश. मराठिला एकाहत्तर मार्क.
पीसीएमबी सगळं ऊडलंतं. गावातली सगळीच नापास असल्यानं मला शिवा कमी बसल्या.
परत बारावीला बसलो. सूटलो. काॅलेजचा नाद लागला. आणि त्यातंन नेव्हीत जायचा विषयच बगलला पडला.
एकदा काॅलेजमधंन तारकर्लीला ट्रीप गेली. तिथलं राॅक गार्डन कायमच आवडत झालंय. एकदा सांगलीत पोलिसभरतीला उतरलोतो. तिथं चंक्या भेटला, चंक्या दोरलेकर. त्यो तारकर्लीत असायचा. मला सांगलीतंन जाताना सांगून गेला कधीपण ये. मी म्हणटलं भारी झालं.
मग एकदा गेलो, ह्या गड्यानं सगळी सोय केली. राॅक गार्डनला तीनला जावून संध्याकळी सातपर्यंत तिथंच बसलं तर वेळ कसं जातंय ते कळायच नही. तिथं सी कुंकबर, अर्चिन असत्यात. चंक्या शिवा द्यायचा. काय ऊगच खुळ्यागत माशाच्या भवती लागत बसतोस म्हणून.
आमच्या हिकडंची लोकं लिंबू करायला तिकडंच जात्यात. चंक्याला तसलं काय पटायच नही.
तीनदा आमी भेटलो. नंतर चंक्या कर्नाटकात गेला. जायच्या आधी सांगिटलाता कायतर पोटापाण्याचा बघायला तिकडं जाणार हाय, तू पाण्याच्या नादाला लागू नकोस. नंतरन काॅन्टॅक्ट बंद झाला. तारकर्ली ला जायच बंद झालं.
घरात थापा मारून दोन दिवस बहीर काढायचं ह्यात मज्जा हूती. त्यात सूरमई मला लै आवडायची. तिकडली कोकणातली आणि हिकडची ह्यात लै फरक. सूरमई खाताना काटं टोचत नहीत.
आता ह्या गेलेल्या दिवसाकडं बघून हसायला येतंय. खरं कवातर एकदा नेव्हीत जाणार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं