शहरात काय मेळ नसतंय

शहरात काय मेळ नसतंय. ऊगचच भरलेला भंपकपणा. मोठ्ठीच्या मोठ्ठी बिल्डींग आणि त्यात कोण विचारत नसलेला एक फ्लॅट कुठल्यातर मजल्यावर. सकाळी ऊठून माॅर्निंग वाॅक करून पेपर वाचूपर्यंत दहा वाजतंय. तिथंन गडबडीत शिळं झालेलं माळव्याची भाजी नहीतर पच्चपाणी असलेल्या आमटीची वाटी आणि तेल सोडा टाकून हवा भरलेल्या चपात्या खावून कामावर पळा.
तिथं राबून आलं की परत घरात येवून काम. आणि रडक्या सिरीयल बायकूबरोबर बघून पोराचं अभ्यास घेतल्याची नाटकं. मग दमून भागून झोप.
ती गर्दी, सिग्नलला वाट बघत बसणं, कधीकधी वाटतयं मधल्या मजल्यावर एक फ्लॅट घेवून पिलरंच पाडून टाकावं.
त्यापेक्षा गावात सकाळी ऊठा, गैरमसरांच शेणघाण करा, वैरण आणायचं, आकरी दूधाच चहा प्यायच, नाष्ट्यालाच झुणका भाकरी नहीतर सांजा खायाच. दूपारला रानातंन आलं की गार आंघोळ करायचं. जेवलं की कट्ट्यावर नहीतर आंब्याच्या झाडाखाली जावून झोपायचं. झोपून ऊठलं की परत चहा प्यायला जायचं. संध्याकाळला कुठतर देवळात ते बसून गावाची माप काढायची. कशाला कोण जबाबदार हाय त्यावर चर्चा करायचं. गावातलं मॅटर ऐकत बसायचं. रात्रीला पाणी पाजवायला जायचं. तिथंच रानात झोपायचं.
सकाळी घरातली हूडकत येत्यात. कोणतर मेलं की मयताला जायाच, लगीन असलं की दोन दिवस अगोदर पडाक बसायचं. असल्या बारा भानगडी गावात असत्यात. कोण बोर मारत असलं की त्यला पाणी लागलं तर त्यला खूश करायचं, नहीतर पउसच नही तर पाणी कुठनं येणार म्हणायचं. ?
गावात कोणबी बुलट घेतलं की गावाला कळतंय. फायरिंगवरनं वळखत्यात. मुंबईत धूरळा बसलेल्या पंचर झालेल्या फोरचूनर बघितल्यात.
गावात सगळीकडंनं लोकं तुमचा काटा काढायला बसलेली असत्यात. जरा कोणतर गडी हालतोय असं दिसलं की महिन्याभरात रिंगाण घेत्यात. गावात राहानं म्हणजे पावलंपावलं जपून टाकायला लागत्यात. smile emoticon
आणि शहरापेक्षा गावाचाच नादखुळा असतोय wink emoticon
नंतरनंतर शहराची कौतुक करणारी लोकं म्हातारडी झाल्यावर फार्महाऊस बांधत्यात कोकणात ! 

टिप्पण्या

मुकेश म्हणाले…
मी शहरात येण्याआधीच ठरवले होते
चाळीशी नंतर गावात जायचे..
मारायचे ते तेथेच .. अमररथावर जाण्यापेक्षा चार खांदे बरे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं