प्रत्येक माणूस एकदातर लेखक असतोयच.

पयला लेखकांबद्दल अनेक विचार डोक्यात यायचे. लहान असताना वाटायचं लिवणारे सगळे लोक लेखक वाटायचे. बँकेत गेलो की वाटायचं तिथले सायेब मोठ्याच्या मोठ्या वहीत कायतर लिवायचे. त्यापेक्षा जोरात शिक्का मारायची. पण शिक्का मारतेलं दिसत नव्हतं. काॅट काॅट आवाज यायचीत. तरी नंतर पाचवीला ऊंची वाढल्यावर ते आकडं लिवत्यात असं दिसायचं. गणिताची पूस्तंक हीच बँकेतली सायेब लोकं लिवत असतील असं वाटायचं.
हायस्कूलला आल्यावर शितोळे सर हूते ते शिकवत नव्हते खरं तिथ टाईपरायटर हूता त्यावर ते सारखं सारखं कायतर लिहत बसायचे. तिथंच लायब्ररी होती. हायस्कूलला लॅबोरेट्री पण हूती. मोठ्ठीच्या मोठी. मला लायब्ररी आणि लॅबोरेट्रीतला फरकंच कळायच नही. कशालापण कायपण म्हणटलं की चालायच पोरांच्यात. नंतर काॅलेजला एकदा एल.आर (लेडीज रूम) बद्दल कन्फ्यूजन झालतं.
तर लॅब मधले चव्हाणसर पण कायतर लिवायचे.
पण ते अहवाल, पत्र असलंच कायतर लिवायचे. ते कधीच काय पूस्तक वगैरे लिवले नहीत.
जोडधंदा म्हणून कारकून लोकांनी पुस्तक लिवत असतील आणि नंतर ते लेखक पदावर बढती मिळत असेल असंपण वाटायचं. खरं नंतर नंतर सगळं कळलं. मी लेखक लेखिका पेप्रात लिवणार्या लोकास्नी भेटलो. मग माझं गैरसमज दूर झालं.
तरीपण प्रत्येक माणूस मराठीचं पेपर सोडवताना लेखकंच असतोय. सगळ्यात भारी गोष्ट मंजे व्यक्तीमत्व विकास किंवा कार्यानूभवची छापील पूस्तंक असत्यात सातवी आठवीसाठी. त्यात एक घटना देत्यात आणि अशावेळंला तुमी काय कराल ? असं प्रश्न असत्यात. त्यावर एवढी भारी उत्तरं पोरं लिवत्यात काय विचारू नका. मी तसली पन्नास वर्कबुकं वाचून काढली.
त्यात एवढी मज्जा असत्या काय इचारू नका.
एक उदाहरण देतो. (थोडक्यात उत्तरे द्या.)
तुमचा मित्र परिक्षेला जाताना देवाला नवस करतो.
उत्तर : पहिला त्याला समजून सांगेन. ऐकला तर ठीक नहीतर त्याला कानाखाली मारून सांगेन.
अशी अनेक प्रसंगं आणि इदरकल्याणी उत्तरं वाचून लै हसलोय. तेवढीच चांगलीपण उत्तरं पोरांनी लिवल्यात.
खरं प्रत्येक माणूस एकदातर लेखक असतोयच.

टिप्पण्या

Mohini Dandge म्हणाले…
मस्तच लिहीलय तू

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं