जनावरं चांगलीच असत्यात.

जनावरं चांगलीच असत्यात. कधीकधी वाटायचं नुसतंच जनावरं असली की बरं पडल. म्हणजे ए टू झेड जनावरं शिक्युरीटी देणारी लावायची म्हणजे कोणच तुमच्यापर्यंत आक्रमन करू शकनार नही असं. वाघ, बिबट्या, शिंव, कोल्ही, कावळी, आस्वल, पारवाळ, आग्यामव्ह, कुत्री,हात्ती घोडं रेडं म्हसरं गैरं, पैसा किडा, बेडक्या, चिचूंद्री, रानडूक्कर, गेंडा, साप, विंचू, पाली, सरडं, साळिंदर, घूस, मुंगूस असलं सगळं पाळायचं. म्हणजे पिल्लू असताना सगळ्यासनी घरात आणायचं. जीव लावायचं माया करायचं आणि एकदा वळखपाळख झाली कि सगळी आपलं ऐकत्यात. पैसा किडं कंपाऊंड गेटजवळ ठेवायची, कोणतर आलं की एकतर वुळवूळत आपल्यापर्यंत येतय, मग दारात कुत्री असत्यात ती सोडायची. डॅल्मेशिन, राॅटवेलर, ग्रेटडेन, डाबरमॅन, मूधोळ असली एकदम भुकायला चालू केली तर काय हूईल ?
पाचसहा साळंदर डोश्क्यावरंन हिंडाली तर ?
मग आग्यामव्ह उटवायचं.
बेडक्या नूसती डराव डराव करून शत्रूसैन्याची ढीली करत्यात. मग म्हशी एका कडला आणि रेडं एका कडेला ऊशीर बांधून ठिवून सोडली की शत्रूसैन्य शिंगानं घायाळ हूईल.
असं एवढं असल्यावर गावातंन वाघ नहीतर शिंवावर बसून हिंडायच.
हे आत्ता शक्य नही आपल्या देशात. frown emoticon
पण पिल्ली इम्पोर्ट करून संख्या वाढवून प्रत्येकाला वाटणीला थोडं तरी प्राणी पायजेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं