साखरमाळ

पाडव्याच्या सकाळपारी बाजारला गवारी घेवून आलोय. पोतंभर कवळी गवारी ठोक घातल्या. गठळभर निबार गवारी बसून हातकाट्यावर विकलोय. पलिकडे एक आळसुंबडी काकू सूजल्या डोळ्यानं बसल्या, तिच्याकडे काकडी, वांगी मिरची, शेवगा, वाळूक हाय. 
मला बसालतो तेवढ्यातंच ऊठूठ ऊठूठ करायला लागली, मी म्हणटलं काय ?
एवढी मिरची वतून दे मग तीच पोतं खासकन ऊचलल तर दमानं दमानं असं जोरात वरडली. तिच्याकडंचा सगळा माल दोन तीन नंबरचा हाय. म्हणजे टाम्याटू लालरविंद्र हायीत. पुढच्या बाजूला एक फ्रेश तोंडाची बाई हाय तिच्याकडंचे टाम्याटू बरे हायीत.
एकटी पोरगी स्कुटी घिवून आली. माझ्याकडं अर्धा किलो घेतली, गाडी चालू हूईना. कोथमीर विकणार्या काकाला बोलवली. काका तेजीत हाय गिराईक दम खाईना, मला म्हणटला बघ जरा, आणि तिच्याकडं गेला. ते स्टार्टर मारल, किक मारल यरवाळी घाम आला काकाला. तरीबी चालू झालं नही. म मला शुक शुक करून बोलवली. गेलो, किल्ली बघितलो तर ते चालू नव्हतं फिरवलो, स्टार्टर मारल्यावर गाडी चालू. ही जिभ चावली आणि जोरात हसून दाताची साखरमाळ दाखवली. थँक्स हं म्हणटली.
मी बी वेलकम म्हणटलो.
काका रागानं बघून हसला.
दर बरा मिळला. पाडवा हाय आज. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं