रस्तं भारीच असत्यात. नंतर फाटं फूटत्यात. सावली देणारं एक झाड असतंय. 
......................................... .............
टाईलच्या फरच्या असल्या की पायतान पण उचलून हातात घ्यायला लागतंय. 
.........................................................
चिरमूरं फूटाणं खाल्लं की तहान लागत्या. त्यावेळी पाणी जास्त प्यायचं नसतंय.
.........................................................
सकाळी एक टमटम बर्फाच्या लाद्या घिवून चालंलत, त्यातंन पाणी पडालतं. मागं एक सायकलवाला दोन घागर्या घिवून पाणी आणायला चाललाता. पायंडल मारून त्यला घाम आलता.
...........................................................
सरदार गब्बरसिंग पिच्चर बघितलो आज. बरा हाय. काजू अग्रवाल आगायाया लै काटा दिसल्या.
...........................................................
अमेरिकेच्या दोनचार पोरी बर्नीसायबांच्या प्रचारकार्यात गेल्यावर भेटल्या. सकाळपास्नं बोलालतो. तिकडंची एक बोंब म्हणजे हवामान. बर्फ पडालय. मी म्हणटलं हिकडं लै ऊन पडलंय. ती म्हणटली जवळ बीच हाय काय नही ? मी सबंध मूंबई कोकणफाटा तिला सांगिटलो. जा स्विमिंगला म्हणटली. स्विमींगला बीचवर चाललं तर दिवाळं निघायचं. लै बोललो ईंग्लीशमधनं. सगळं व्हय व्हय म्हणटली आणि शेवटाला Idiot म्हणटली.
...........................................................
मी या जगात आलो आणि नंतर कळलं आमाला आडीच एकर रान हाय.
...............................................................
आजचा लोकसत्ता बरा हाय. गिरीशकाकानी छान लेख लिहलाय डाॅ. आंबेडकरांचं अर्थशास्त्रातलं अभ्यास कळला. असंताचे संत मला लै आवडलंत. ज्यावेळी आपन अनेकांच्या नजरेत गाजलेल्या समाजसेवकाबद्दल बोलतो, त्यावेळी टीका ठरलेलीच असत्या. (शेवटून दूसरा परिच्छेद कदाचित ह्याच गोष्टीतंन गिरीशकाकानं लिवलं असेल.)
.................................................................
पिच्चरात काम करावं वाटलं की शंभरच्या बलापुढं रात्रीला ऊभा राहून एॅक्टींग करायचं. मोठ्या पडद्याची हौस फिटत्या.
.........................................................
चंद्र बारकं असलं टोकदार दिसलं की त्यला लोवाराकडं निवून खूरपं करावं असं वाटतंय.
smile emoticon frown emoticon grin emoticon gasp emoticon heart emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं