tirupti

कितवीला काय आठवत नही खरं एक 'सिद्धार्थ बुद्ध झाला !' ह्या नावाचा धडा हूता मराठीला, त्यात असं होतं की राजवाड्यातंन पहिल्यांदा बाहेर पडल्यावर त्याला सगळी प्रजा दिसते आणि तो दुःखी होतो. 
गेलं तीनचार दिवस तिरूमला मध्ये (बालाजी) इथं आहे. आज यायलोय रात्री. 
तिरूपती खाली आणि डोंगरावर तिरूमला आहे. तर त्या तिरूमलामध्ये देवस्थान असूनही कुठं दुःखी आणि म्हातारी लोकं दिसली नाहीत. मला झपाट्याला पंढरपूरच आठवलं. पंढरपूरात काय परिस्थीती असत्या, तिथली स्वच्छता इथली स्वच्छता तूलना करायची झाली तर जमिन आसमानाचा फरक पडल. बरेच पाॅईंट बघितले. पण स्वच्छता सगळीकडे काटाकिर्रर.
मला वैयक्तीक देव वगैरे गोष्टीवर विश्वास नाही, आज ज्या लेण्या किंवा कलाकुसर वगैरे आहे ती ठिकाणं देवांची आहेत, तरीपण बालाजी हे बरं आहे, अतिओंगळवानं आणि जबरदस्त घोषणाबाजी ते काय नही. कोणतर गोविंदा म्हणटलं की गोविंदा गोविंदा इतकाच रिप्लाय. त्यापलिकडं दूमदूमनं नाही. डोंगरावर असल्यानं घाटातंन यष्टी जाते चिक्कार झाडं हायीत, रोड सगळे जबरदस्त, पोटातलं पाणी हालत नही.
इकडचे आंध्रातले लोक लुंगी उर्फ धोती घालतात. आपन जर धोती घातलं की काय फरक पडतंय बघूया म्हणटलं आणि धोती घालून हिंडाल्यावर तुम्हाला सामी (स्वामी) म्हणतात. कुत्रं माग लागल्यागत ह्यांची भाषा हाय. कायबी समजत नही, म्हणून सकाळी एक अंकलपि घेतलोय, ते तमिळ टू हिंदी हाय . त्यातली तमिळ अक्षरं नांगर मारल्यावर ह्यंटं वर येत्यात तसलं दिसतंय. खरं उच्चार भारी वाटत्यात. उदा, बेवकूफ= मूर्खुडू, बहादूर=वीरूडू, सूरज = सुर्यडू, जानवर = जंतवू.
डू मु ऊ असले प्रत्यय लावल्याने इथे कवि लोकांचं प्रमाण जास्त असलं का काय ? अशी शंका येत्या.
आज खाली आल्यावर आत गावागल्लीत हिंडल्यावर लक्षात आलं दूरून डोंगर साजरं. गावं आपल्यासारखीच घाणेड्री हायीत. चंद्राबाबू नायडूचं सूटाबूटातलं पोश्टर लालेलं हायीत. इडली डोसा पोंगलं केळ्याच्या पानावर जेवून भारी वाटलं.
आज नऊची ट्रेन हूती ती बाराला गेल्या म्हणून पिच्चर बघायला आलोय. आत्ता पार्ट्या पडाल्यात. भारी असल असे वाटतंय. smile emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं