माझं Aनावावरच्या एका मुलीवर प्रेम हाय.

माझं Aनावावरच्या एका मुलीवर प्रेम हाय. मला वाटते तिचे पण माझ्यावर असेल. तिने मला एकदा इक्लेयर्स दिलते. मग मी तिला फाईव्ह स्टार दिलो. मग तिनं मला काळं खारिक दिलं मग तिला मी डेरी मिल्क कॅडबरी दिलो. मी तिच्या लेक्चर रूम पासनं गेलो की ती बाहेर लगेच यायची मग मी ती व्हरांड्यात ऊशिरभर बोलत राहायचो. एकदा आम्हाला एकांत मिळाला हूता. पण एकट्या इद्र्या मित्राला तवाच आठवन आली आणि दार धडकून आत आला आणि बसाबसा म्हणटला. अशा रितीने त्याने एकांताची वाट लावली. इतर पोरीप्रमाणे हि सुद्धा बडबडी आहे, पण मोजूनमापून बोलते, आवाज गोड आहे. जिभ दातात धरून बोलल्यागत बोलते. ती म्हणटलीती आपन काॅफी प्यायला जावू. ते कधीच अजूनपर्यंत झाले नाही. 
तिच्याकडं मोबाईल नाही. म्हणून तिचे मला पाप वाटते. माझं एक मोबाईल वापरात नसलेलं दिलो तर नको म्हणटली. मग ते माझ्या भावानं उचलंल. परवा फ्रीडम दोनशेएक्कावन मोबाईल बुक करताना तिची आठवन आली होती, मग मी दोन मोबाईल बुक केलो, म्हणजे ते अॅक्सीडन्टली झाले. 
तिच्या मैत्रीणीकडे मोबाईल आहे. मला तिची आठवण आली कि मी मैत्रीणीला फोन करतो मग ती तिच्याकडे देते. मग आम्ही बोलतो. अंदाजे पंचवीस मिनीट बोलावे असे वाटते. त्यात तिचे हसणे पाच मिनीटे, हम्म करणे तीन मिनीटे आणि अधेमधे नेटवर्क मुळे ऐकू न येणे दोन मिनीटे. म्हणजे ही दहा मिनीटे वाया जातात की काय असे वाटते. हे आकडे अंदाजे आहेत.
तिचे नाव A वरून आहे. A नावाच्या पोरी छान असाव्यात असा एक माझा समज झालाय. हिचे नाव न सांगण्याचे कारण म्हणजे ती पटू शकेल ही शक्यता नव्वद टक्के एवढी आहे. पण बहूमताचे काय खरे नसते असे एकेकदा वाटते. 
आज हिची आठवण यायच कारण म्हणजे काका भेटलीत. काका चांगले हायीत. पाव्हण्यांच्यात हे एकटे मला आवडतात. लै मदतीला पडतात. मावशी काका हे लै पुढाकार घेतात. कोणबी मेलं किंवा कुणाचं लगीन असलं की. आमच्यात एकच मतभेद आहे. काकाला राजु शेट्टी आवडतो आणि मला पवारसाहेब. मग कधीकधी भांडतो. आता सत्तेवर भाजपा आल्यापास्नं मला चान्स आहे चिडवायला. मी काकाला चिडवायचं प्लॅनींग करतो खरं नंतर चिडवत नही. काका हसत बोलतो. काकाला सहज सांगितले मला Aनावावरंन ची पोरगी आवडते. काकाचे ते लांबचे पाव्हणे आहेत. मला काकाचे हे लै भारी वाटते काकाचे पाव्हणे नसावेत असे कोण नहीतंच या जगात. काका कुठलंतर लिंक कुठतर जोडून पाव्हणंपै करतोयचं. काका चांगला आहे. 
मी काकाला A चे प्रकरण सांगितले. काका म्हणटला पोरगी चांगली हाय. मी म्हणटलं तुमाला कसं महित ? 
काका म्हणटला 'तिचे ऐबाबा चांगले आहेत.' 
जोकच वाटलं ऐबाबा चांगले असले की पोरगी चांगली. 
तर काका आज भेटला. काकाजवळ दोघंतीघं बसलेलीत. मग मी काकाबरोबर चांगलं बोललो. राजकारणाचं विषय काडलो नही. काकाला लागून एक इजारवाला बसलाता. इजारवाल्याचं डोळं मला A सारखं वाटलं. इजारवाला पान खात बसलेला. काका पान खात नाही. मग मी तिथं थांबायच ठरवलं. काकाजवळ कट्यावर बसलो. काका हळूच कानात कुजबूजला ह्यो तिचा आज्जा. मला वाटले हुते. मी लहानपणापासनं ह्या खेळात हूशार आहे. कॅटरिना आणि महमद कैफ च्या वेळी माझा आंदाज बरोबर बसलाता. तिच्या आज्जाने मी कोण म्हणून काकाला इचारले. काकाने माझी वळख करून दिली. काय जेवण झालं का आज्जा ? असं इचारलो. प्रामाणिक पोरानी असंच बोलायचं असतं. मी प्रामाणिक आहे. आज्जा प्रामाणिक आहे. कारण आज्जा जेवला असे वाटत आहे. पान खाताना अधूनमधून अब्ब असं ढेकर देत होते. मग मला आज्जाने शाळा कितवी शिकलास कुठ शिकलास असे विचारले. मग मी काॅलेजचे नाव सांगितले. 
आमची नात पण तिथंच हूती की म्हणटले. मग मी नाव विचारले. त्यांनी A चे नाव सांगितले. मी म्हणटलो माहित आहे. तर आज्जा म्हणटले तुला कसं माहीत ? मी म्हणटलं ती उशार आहे. सारखं मॅडमसर तिचं नाव घेत असतात. आज्जा हसला कौतुकानं. आणि चारमिनटं आमची नात म्हणजे.... 
या विषयावर बोलला. नंतर मला नाव इचारले. आणि म्हणटले जावून इचारतो तुला ओळखत्या काय ते ! 
मला हासू आलं. आवघडंच हाय. असे घडेल असे वाटले नव्हते. काका चांगला माणूस हाय. काका बी माझं कवतुक करायला लागला. आज्जा बेश्ट म्हणटला. मला कोणतर कवतुक करायला लागलं की हासू येतंय. आज परत ती आठवली. ती उशार हाय. मी प्रामाणिक हाय. काका चांगला माणूस हाय. आज्जा काय हाय ते बघायला पायजे. आज्जा चांगला हाय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं