काका काकू वडापाव

रेल्वेत हाय. 
पलिकडं एक काका काकू बसलेत. दोघेही जाड हायीत. मघाशी ते जेवले. नंतर बारिकमधे भांडले. ती भांडणं जेवणावरंनं झाली. म्हणजे काकू कमी जेवलीत. काका म्हणटले काय गं ही नाटकं ? 
मग काकू म्हणटली मला कमी भूक होती म्हणून कमी जेवले. मग दोघं एकमेकाकडं बघून हसले. 
नंतर काकू म्हणटली वडापाव घेवूया ? 
काका चक्रमगत करालंय. जोरात म्हणटला वडापाव ?
मग काकू खिडकीतंन बहिर बघत बसली. काकापण.
एकटा वडापाववाला येवून गेला. नंतर दोघंपण बहिरची नजर हटवत वडापाववाल्याकडं बघत राह्यले.
ते दोघेही वडापाव सारखे दिसतात. मला लै हासू यायलय.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?