म्वोदीनं दोन वर्षं झाली पयला हाप्ता बी दिला नही.

बंड्या रंकाळ्यावर फिरायला गेलता. निराश हूता. तिकडं एक गोरट्यालं जोडपं ह्यला दिसलं. कोल्हापूरात यवढी गोरट्याली कुठंनं काय आली म्हणून आश्चेर्यचकीत झाला. ह्यचं इंग्लीश मापटंभरं नव्हतं चिपटभर हूतं. तेवढ्यावर गावातल्या लायब्रररीत टाईम्स आफ इंडिया इकानामिक टाईम वाचून फुढारकी करत हूता. 
कोण नहीत ते बघून भेळ खात खात त्या गोरट्याल्या जोडप्या जवळ गेला. पहिला इचार केला इंग्लीश झाडायचं आणि जोडपं पुण्याचं निघायचं. 
मागं एकदा असंच झालतं. हे फाॅरेनर हायीत म्हणून व्हेअर आर यु फाॅर्म ? असं विचारला तर ती म्हणटलीत आम्हाला शुद्ध मराठी येते हं.
म्हणून पचका हू नये म्हणून पयल्याझूट मराठीत बोलला.
कुठलं म्हणायचं तुमी ?
मग त्यातला बापंय म्हणटला, 'sorry. english ?
हे सुखावलं. म्हणटलं व्हेअर आर यु फाॅर्म ?
ती म्हणटली अमेरिकेतंन आलोय.
मग हे आणि ते दोघं इंग्लीश बोलाय लागली.
ह्ये म्हणटलं, इलेक्शन ते सोडून हिकडं कुठं बोंबलत आलायसा ?
त्यातली बई म्हणटली 'वी जस्ट लव इंडिया' वी वाॅन्ट इंडियाज सिटीझनशीप.
हे म्हणटलं वाॅव !
मग ह्यला भारी वाटलं, आपल्या देशाबद्दल किती आदर ! ह्या गड्यानं सगळं कोल्हापूर फिरवून दाखवलं.
अंबाबाई, युनवरसिटी, रंकाळ्यात बोटिंग, उद्यमनगरात फडतारे मिसळ, न्यु पॅलेस आणि बरंच काय काय. रात्रीला एका हाटेलात तांबडं पांढरं साठी नेलं. ताट आलं. तिथल्या टीवीच्या स्क्रीनवर बातम्या चालु हूत्या. आधनं मधनं म्वोदी सारखं दिसत हूते. म्वोदी दिसलं की जोडपं हारखायचं.
ह्यला काय कळंनाच. ही का हारखाल्यात ?
मग बोलताबोलता म्वोदी भाजेपचा विषय काढला.
ती म्हणटली, 'मोदी इज ग्रेट लिडर. ही अनाऊंसड द्याट ही धिल गीव्ह फिफ्टी लॅक्स पर इंडियन'
मग बंड्याला त्यंचं भारतप्रेम आणि परराष्ट्र धोरण कळलं. ह्यचं डोस्कं फिरलं स्टार्टर असून किक मारला गाडीचं आणि कोल्हापूरास्नं शिरोळला यायला लागला.
येतायेता इचार करू लागला. म्वोदीनं दोन वर्षं झाली पयला हाप्ता बी दिला नही. खाझदारला आंदोलन करायला लावलं तर ?
रस्त्याला ऊसाची टॅक्टर सारखं आडवं येत हूती.

टिप्पण्या

स्वप्नपूर्ती म्हणाले…
प्रिय लेखक, आपला लेख आम्हास आवडला. खरच फार चांगल छान लिखाण आहे तुमचं.
बंड्या ची अर्धवट गोष्ट वाचकांना आवडली आहे. कृपया बंड्याच पुढे काय झालं ते ही लवकरात लवकर कळवा.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं