अशा ऊकाड्यात कविता केलं पायजे असं वाटत आहे.

कवी कवयत्री लोकांचे कौतूक करावं तेवढ थोडंच हाय. लहान असताना कविता म्हणजे यमक जूळलं की कविता झाली. नंतर कळालं नुस्तं यमक जूळून चालत नही तर त्यला अर्थ पण लागतोय. नंतर एकेक कविता बिनयमकाच्या वाचायला गावल्या. त्या पण बर्या असतात. गझल हा प्रकार आवडतो. त्यात भानगड म्हणजे वृत आणि मात्रा असत्यात. त्या वाचलं की भारी वाटतंय. म्हणजे गालाला लागा, लागालागा, लालागाला असं ते असतं. आपल्याला त्यातलं कायच कळत नही. कवीतेचं अर्थ कवी कवयत्रीला एक लागलेल असतंय आणि आपल्याला निराळंच लागतंय. 
त्या कवी लोकास्नी काय वाटत असल अर्थाचं अनर्थ झाल्यावर ? 
कुठल्यातर कवी किंवा कवयत्रीच्या लग्नाला जावून नावं घेतलेली ऐकावं असं वाटतंय. 
आमच्या पै पावण्यात कोणच कवी नही सगळी शिनेमातल्या गाण्यावर नाचणारीच हायीत. 
जे न देखे रवी ते देखे कवी. मला ह्यातलं रवी म्हणजे ताक हलवायच असं वाटत हूतं पण नंतर सूर्य कळलं. अंधारातल्या कविता कोणतर केलं असल काय ? 
अंधारातल्या कविता करणारी लोकंच खर्या अर्थानं कवी कवयत्री हूतील. 
दूसरीला एक कविता हूती. 
छोटाले बहिण भाऊ 
उद्याला मोठाले होवू
उद्याच्या जगाला 
उद्याच्या युगाला
नविन आकार देवू !!!
मला तवा मोठंपणी असं करायच तसं करायच आणि आकार द्यायच असं वाटत हूतं.
आमच्यातला एकटा जेशीबी घेटला आणि तो आता आकार देत बसलाय. मला वाटतंय त्याची प्रेरणा ही कविता असल. 
तरीपण बिंडाभरून शब्दं गोळा करून आणायची ती व्यवस्थित टाकायची हे दांडगं काम करणारी लोकं हायीत म्हणून दिवसं निघत्यात रात्री सरत्यात. 
एक तरी कविता प्रत्येक माणूस लिवतोच किंवा म्हणतोच नाहीतर जूळवत बसतो. 
अशा ऊकाड्यात कविता केलं पायजे असं वाटत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं