टिकली

लग्न झालेल्या पोरी टिकली लावत्यात. आजीबाई काकूपण लावत्यात. मला पुर्वी मोठं कुंकू किंवा टिकल्या लावणार्या आज्ज्या बघितलं की भारी वाटायचं. त्यावरून त्यांची नवरं कसली असतील असं वाटायचं. एकदा सातवीत असताना कापडाच्या दूकानात गेलतो. त्यावेळला एक काकू तिच्या पोरग्याला घिवून आलती. आणि सारखं हे नको ते दाखवा करत हूती. मी मामाबरोबर गप्प बसलोतो. ती म्हणटली त्या पोरग्याला पप्पाना आत बोलव. पप्पा म्हणजे तिचा नवरा कसला असेल असं डोक्यात आलं. तोपर्यंत ते आत आले. बिचारा गरीब हूता. टिकलीच्या निम्यानं बी बिचार्याचं वजन नव्हतं. 
अनेकदा मी मोबाईल रिचार्ज करायला गेलतो. तशाच एक काकू आल्या आणि दहाचं व्हावचर घेवून गेल्या. 
एक मॅडम होत्या इंग्लीशला त्या नामाटं वडल्यागत टिकली लावायच्या. मला त्यंची भ्या वाटायची. खरं नंतर चांगल्या बोलल्या. मग मी त्यांना सांगितलो तुमची टिकली बघून भ्या वाटते. त्या हसल्या, आणि नंतर कवातर घरच्याना सांगितलं. मग मम्मीनं तुला कशाला लागतंय सगळं म्हणून दोन हाणलं. मग मी हे जाहीर शोध बंद केलो. 
तरीपण कवातर टिकली किंवा गंध बघितलं की तिचा नवरा कसलं हाय ते बघू वाटायचंच. 
ते चंद्रकोरटाईप टिकली एका पोरीनं लावलीती. गळ्यात लायसन हूतं, म्हणटलं चंद्र कसलं हाय बघूया तर चंद्राच डोक झळझळीत चमकणारं टकला हुता. पडून पडून हसावं वाटलंतं. 
खरं कंट्रोल केलो. 
कायपण म्हणटलं तर टिकली न लावणार्या पोरीच काटा दिसत्यात 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं