कसं एंजोय करू पावूस ?

आत्ता मातीचा वास यायलाय म्हणजे कुठंतर दहावीस किलोमीटरच्या आत पावूस पडालंय. हे मातीचा वास, जुन्या आठवणी, काॅफीचा मग किंवा चहाचा कप तळलेली कांदाभजी आणि गारवा ठिक हाय खरं ह्यो पावूस कुळव मारतोय शेतकर्याचा. शाळू आणि द्राक्षेवाली लोकं घाबरून जात्यात. ऊस जाणारी शेतकरी तर पाक मोडून जात्यात. रान वल्लं हूतंय ऊसाला रस्ता नसतंय. किचकिच हून सगळं टॅकटर आडकून बसतंय ते काढायला आणि चार टॅकटरी आणायला लागत्यात.
शाळवाचं तर लैच आवघड कंडीशन पावूस पडला कि जुंधळं काळकुट्ट हूत्यात. भाकर्या वर्षभर लाल हूत्यात. कडब्याचा पाला बोंबलत जातंय. धाटाला जनावर तोंड लावत नही. हे चारदिवस पवूस पडून घाण हूतंय. नंतर ते म्हणटलंय की कोणतर 'नेमेची येतो ऊनाळा' का काय तसं येतंय. मग वैरण नही पाणी नही कडब्याला तर ऊंट घोडा आणि गाढव एकदम लागत्यात. ऊंट कणसाला, घोडा पाल्याला आणि गाढाव बूडक्याला. मग ऊनाळ्यात काय मीठ आंगाला लावून आडवं पडायचं का काय ?
द्राक्षेवाली वर्षभर औषधाचा यसटीपी खाली ठेवत नहीत. गारा पडत्यात तवा पत्र घालता नही येत. घस गारा पडल्यावर खूशाल हूतंय.
इज्जत , सामाजिक प्रतिष्ठा, नितीमत्ता, नैतिकता शेतकर्याच्या नसानसात मग दोरी नहीतर ऊरलेली एक बाटली ह्यापलिकडं हाताला बी काय गावत नही ऐनटायमाला.
कार्यक्रम झाला कि दूसर्या दिवशी पेपराला बातमी. विष 'प्राशन' करून कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्या.
कर्जबाजारी ह्यातलं 'कर्ज' शेतकर्याला चांगलं माहित हाय. 'बाजार' जर माहिती पडला तर अशी वेळ जाईल म्हणत नाही हाणून नेता येईल. असं वाटतंय.
कसं एंजोय करू पावूस ?







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!

हागणाऱ्याने लाजावे की बघणाऱ्याने लाजावे?

हातकणंगलेचा किंग मेकर कोण?