poem (तीन चिपट्या घवू गाड्या भरल्या नवू)

लोकं शिकली 
शहाणी नाही झाली. 
पिएचडी केली.
डोनेशन भरून नोकरीला लागली.
अच्छे दिन येतील म्हणटली.
मोदीला निवडून आणली.
भाषनं आवडली.
टाळ्या वाजवली.
टाळकी तिथंच ठिवून आली.
वाॅटसपवर रमली
फेसबुकवर गमली
जोडी जमली
तिथंच भांडत बसली.
कुणाला शानं म्हणटली
कुणाला खुळं म्हणटली
रात्रीला चार्जिंगला लावून सकाळी नोटिफिकेशन बघितली.
लोकं शिकली
शहाणी नाही झाली
तटस्थ राहिली
ठिणगी इजली
मंत्री माजली
ट्रेंड केली
जनता बोंबली
इथ नको तिथं केली
त्यात फसली
सगळी हसली
(तीन चिपट्या घवू गाड्या भरल्या नवू)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं