डिक्शनेरी वाचायला भारी वाटतंय. grin emoticon

मला एक घाण सवय आहे. अलिकडं वाढल्या म्हणा. माझे बरेच चांगले मित्र मला पुस्तकं देत्यात. काहीजण इंग्लीश देत्यात पूस्तकं. मग काय हूतंय की एखाद्या शब्दाचा अर्थ लागत नाही. मग माझ्याकडं एक ऑक्सफर्ड डिक्शनरी हाय. त्यात मी अर्थ शोधायला जातो. 
पायजे ते सापडलं की मग मी दोनवेळा अर्थ समजून घेतो. हे आक्सफर्डवाले बरं वाटत्यात शब्दाचा वाक्यात उपयोग करून दाखवत्यात. मग जरा समजायला बरं पडतं. पण माझी एक सवय पडल्या लहानपणापासून. कुठल्यातर शब्दाच अर्थ शोधायला जातो आणि तिथंच जावून बसतो. 
उदाहरणार्थ. Elegant हा शब्द हूडकत गेलो. हा शब्द मज्जा आणतो. इलिगंट, एलिगांट, इलिजान्ट असं मी उच्चार करून बघत बसतो. मूळ उच्चार एलिगंट असाच असावा. आता त्याचे अर्थ बघा मोहक शैली किंवा आकार असणारे; सूरेख, डौलदार, शानदार
वाक्यात उपयोग 'She looked very Elegant in her new black dress'
हे वाचलं की मनात परत विचार चालू होतात.
ती काळ्या कपड्यात मोहक दिसते. दिसली असेल का ? नही म्हणटलं तरी सावळ्या पोरीना काळी कपडे चांगली दिसत नहीतंच. मग ती गोरी असेल असं वाटतं. आपल्याकडं कॅटरिना ज्वाला गुट्टा काळ्या कापडात भारी दिसतात.
सावळ्या पोरीनी ग्रे वगैरे भारी दिसतंय. खरं लाल, काळं, पिवळ, जांभळं पलपल गोर्या पोरींना बरं दिसतं.
दूसरा अर्थ असा की 'ती काळ्या कपड्यात सूरेख दिसते.' कसं शक्य हाय हे ? मूळात सूरेख सूरेखा नावाचेही सूरेख असतील की सांगता येत नाही. तिथं काळ्या कापडानं काय वेताळमंत्र साधलाय काय ? हे पण काय पटत नाही.
तिसरं असं की 'ती काळ्या कपड्यात डौलदार दिसते.' डौलदार काय दिसणं असतं का ? डौलदार चालली. अलिकडं सर्रास पोरी तूरूतूरू न चालता डौलदार चालतात हे मान्य हाय पण काळ्या कपड्याचा आणि चालण्याचा काय संबंध ?
आलं लक्षात ? हां तर काळे कपडे हे उष्णताशोषक असतात. त्यामुळं अंगाला चटकं बसून ती डूलत असेल त्यामूळे डौलदार दिसू शकते. हं ही शक्यता बरोबर ! हे वाक्य दूपारी बोलले गेले असेल. पावसाळा वगळून. त्यावेळेस स्वच्छ सुर्यप्रकाश होता. म्हणून ती डौलदार दिसत होती.
..............................................
हे असले काय नको तेच विचार डोक्यात यायला चालू होतात. आणि मेन जे पूस्तक वाचत असतो ते बाजूला पडतं. असं लै वेळा होतं. खरं मज्ज्या येत्या. ऑक्सफर्ड वाली मला कवाकवा फडकरीच वाटत्यात. खरं डिक्शनेरी वाचायला भारी वाटतंय. grin emoticon

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं