पयलं प्रेम झालं मला ती लै म्हणजे लै आवडायची, आमच्या रानात नानाच्या बांधाला एक इलायचिचाचं झाड हूतं. मी झाडाला कवाच शिवलो नव्हतो. खाली पडलेल्याच चिचा खात हूतो. ती भारी हूती म्हणून तिला कायतर द्यावं वाटायचं. म्हणून इलायचिचा द्यावं वाटलं. खरं खाली पडलेलं कसं दिवु ? म्हणून मी झाडावरंच चडलो. मला भ्या वाटलं नही. चिचा काढून आणलो. मग चेक केलो सगळं एकदा. कुठंतर मुंगी असलं तर तिला काय वाटल ? मग मदा लै कसतर वाटलं. 
पिशवीत घाटलो. घरात इचारल्यावर सांगिटलो मॅडमला देतोय. मग घरच्यानी अर्धा किलो गवार्या बी दिल्या. 
ते घिवून गेलो. मागच्या साइटला बसलो तासाला. तास झाल्यावर ती राह्यली शेवटला. मग मी मॅडमला गवारी दिलो आणि तिला इलायचिचा. ती तिथंच खाल्ली. बिया आणि टरफाल घाणा घातली. मग म्हणटली गोड आहेत. तोंड भरून राहतंय. मॅडमबी खूश झाली. माझं पुढच्या टेस्टला पयला नंबर आला. दूसरा तिचा आलं. 
इलायचिचा तिला आवडल्या. ती मला दोनदा द्राक्षे दिली. नंतर नानाचं ऊस पेटवलं तोड यिना म्हणून त्यात झाड व्हरपाळलं. नंतर त्यला इलायचिचा लागायचं बंद झालं. मी रानात गेलो की वाईट वाटायच. इलायचिचाचं टरफाल गुलाबी. गूलाबाच्या फूलाचा रंग गुलाबी प्रेमाचं रंग ते. असलं कायतर ऊगच्याउगच वाटायचं. नंतर पुढच्या वर्षी ती क्लास लावली नही. ती दूसर्या तूकडीत. त्यातल्या त्यात पारथनेला तिच्या लायनीत ऊभं राह्यला मिळायचं. नंतरन तेबी नही. 
मग प्रेम कमी झालं. 
.....
परवा नानाचं नातू आलंतं तिथं खोपीजवळ एक ईलायचिचा चं नवीन झाड आलंय. त्या झाडाचं काढून त्यला दिलो तर ते म्हणटलं. 
हे लहान फ्लावर हाय का ? 
smile emoticon
नवीन झाडाला चिचा लागल्यात. बघूया आता

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं