प्रपोज डे

तिच्यावर आधी एकदा हा ट्राय करून बसला होता. खरं प्रपोज केला नव्हता. नंतर दोन वर्षं कुठंच संपर्क आला नही. आलातर ती कुठेतर जाताना आणि हा कुठंतरी काॅलेज ला जात असताना. एसटीत च नजरानजर व्हायची. एसटीत दंगा खूप. आत्ता पोरं शानी झाल्यात. दोन वर्षामागं च्यायना मोबाईलवर गाणं लावायची, कंडेक्टर शिवा द्यायचा. त्यात ती तर रिकामी शीट हाय म्हणून शेजारी बसायचं धाडस करणार्यातली नव्हतीच. अशी ही दोन वर्ष गेली. त्यानंतरच्या डिसेंबर महिन्यात सगळ्यांच्याकडंच व्हाटसप आलते. 
एका मैत्रीणीनं ग्रुप तयार केला. ह्याचा नंबर तिच्याकडं होता आणि तिचाही. ह्या दोघांना तिनं त्या ग्रुपवर अॅड केलं. मग ग्रुपवर नूस्ता धुरळा उठायचा. ती आणि हा दोघंच चॅटींग करताहेत असं ग्रुप मेंबराना वाटायचं. मग हळू हळू खटके उडले आणि सगळ्यात आगूदर हा ग्रुपातंन बाहेर पडला. संध्याकाळी पाच वाजलेते. तो एकच ग्रुप होता. जिथं हा रमायचा, त्यातंन बाहेर पडलं म्हणून ह्याला कसतंर वाटलं. मोबाईल टाकला आणि संध्याकाळचंच झोपून टाकला. ती सुद्धा ग्रुप सोडेल. आणि आपल्याला पर्सनल मेसेज करेल असं ह्याला वाटत राहीलं. असं वाटणं भारी असतं. कधीतर राग यायचा. पण ती मेसेज करेल या आशेवर राहायचा. 
रात्रीचं साडेनऊ वाजता जाग आली. मोबाइलकडे धावला. बॅटरी लो होती. चार्जर खूपसला. पॅटर्न ड्रा केला. वाॅटसप वर घूसला. तिचे सहा मेसेज आलते. येवून दोन तास झालते. खूश झाला. ती म्हणटली. आलो ग्रुप सोडून. त्या तितक्या थंडीतबी याला सीता रामाबरोबर वनवासला यायला रेडी हाय असं वाटलं. मग तिथून ह्यांचं चॅटींग सूरू झालं. रात्री अकरा बारा कधीकधी दोन हे गूड नाईटचं टायमिंग झालं. दोनतीनदा हे एकमेकाना भेटले. फेब्रूवारी ऊजाडलं. संध्याकाळच ढवशा वारं सूटायचं. हे वारं एक भारी असतं, कुणावरतर प्रेम करायला लावतं. हा आलरेडी फसलाता. काय करायचं ? 
व्हॅलेंटाईन डे असतो. या महिन्यात आणि निमताला कार म्हणून रोज डे, फ्लर्ट डे, प्रपोज डे हे असतं. फेब्रूवारी चालू झाला की हे मेसेज आदळतात. तसे इकडं ही आदळले. हा तिला तो मेसेज फाॅरवर्ड केला. मग त्यावर चर्चा केली. दोघंही जगाची टर उडवायचे. तरी याला उगंचच त्या डे च अप्रूप वाटलं. गूलाब चा फोटो पाठवला. तिनं बदल्यात चार गूलाब पाठवले. हा खूश झाला. 
ह्याला उद्या तिला भेटून मनातलं सांगायच होतं. एकदाच हू दे हिशेब क्लेर. तिला विचारला उद्या भेटूया ?
ती म्हणटली उद्या गावाला जाणार हाय. ह्याचा मूड ऑफ झाला. परत ह्याला ध्यानात आलं हाॅटसपवरंनंच करूया प्रपोज. तसं सकाळी घरापास्न लांब गेला. आणि दीर्घ मेसेज टाईप केला. त्यात बरेच मूद्दे नमूद केला. आणि व्हाटसपच बरं असतं. हवं ते सिम्बाल मिळतं. चांगला पाऊण तास गेला. आणि खूश होऊन बटनावर किल्क केला. मेसेज गेला. पुढच्याच मिनटाला ब्लू टीक आली. 
पण उत्तर येईना. कधीतर typing...
यायचं जायचं. ही कालवाकालव लै बाद. परत विचार चालू झालं. ही जर होय म्हणटली तर ? जगाला घोडा लावू. पाहिजे तेवढं तिला फिरवू. 
नाही म्हणणार नाही ही आशा होती. नाही फक्त .99 इतकंच याच्या मनात होतं. 
तिचा मेसेज आला अशी अपेक्षा नव्हती तूझ्याकडंन आणि वरून मुबलक शिव्या. 
हा म्हणटला साॅरी. 
ती म्हणटली. आय ट्रस्ट यु. 
ट्रस्ट ?
आपन फ्रेंड राहूया. 
फ्रेंडशीप या शब्दाच्या उद्गात्याला पायतान मारावं वाटलं.
तिनं बरंच मेसेज केले. हा फक्त ओके. इतकाच रिप्लाय देत राहीला. 
पण हा अतिसंशोधकबुद्धीचा होता. दोनं महिनं पाट बांधलोय आणि पाणी येतंच नही ? 
कुठं पाट फूटलाय याचा विचार त्याला गप्प बसू देत नव्हता. 
मग यानं यंत्रणा राबवली. तिची एक खास मैत्रीण होती. दोघं एकमेकीला सोडून हलत नव्हती. तिच्याशी हा चॅटींगला सूरवात केला. पोरी किती केल्यातरी पोरी. एकमेकींवर इर्षा असतेच. पण त्या वरवर दाखवून नाही देत. ह्यानं तिच्याशी गोडगोड बोलाय सूरवात कली. वाॅव नाईस डीपी, ब्युटिफूल गाॅर्जियस ईत्यादी. पंधरा दिवस असे गेले. मग पत्ते फेकायला सूरवात केला. तुझ्यामूळं ती इतकी पुढं आहे, ई. 
मग ती ला अभिमान होताच, तो गर्वात कनवर्ट करायचं काम ह्यानं पद्धतशीर केलं. महिन्याभरात दोघींची भांडनं झाली. ह्यानं शिस्तीत तिचा कोण गडी हाय ? अशी विचारणा केली. 
मग तिनं सांगितलं. दोन वर्षातंच काॅलेजमधला एकटा तिचा होता. खरं तू पण तिला आवडतोस. 
ह्याला काय कळना झालं. फ्रेंड म्हणून राहूया असं ती का बोलली ते याला आत्ता कळालं. मग हा सूद्धा तिच्याबरोबर फ्रेंड राहीला. आणि ऑप्शन शोधू लागला. 
‪#‎Happy_prpose_day‬

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं