माझं एक अकाऊंट काढून द्या की !

जिल्हा मध्यवर्ती बँकंत हा जातो. 
सायेब नमस्कार ! 
पाटील सायेब या या. बसा खुर्चीवर !
काय खुर्ची खुर्ची ? खुर्ची म्हणत्यात व्हय ह्यला ? 
मग काय म्हणत्यात ? 
आसू दे आता.
बरं, काम असलं की थोरले पाटील येतात. आज तुमी कसं काय इकडं ?
चवक्कशी !
कसली ओ ?
(फोन खिशातंन काढत.) त्ये काल बघा, ये .बी. पी माझा वर सांगत हूतीत, फेसबूकवर लायकी आसलं की कर्ज देत्यात.
ते ते त्याला वेळ आहे अजून. ते अजून विचाराधीन आहे.
काय बी सांगता राव, आसं कूठं आसतंय का ?
अहो पाटील. त्याला अजून मंजूरी मिळायची आहे. आणि तुम्ही कुठं आलाय ?
कुठं आलाय मंजे काय ? निवू काय यफड्या काढून. ?
नाही नाही, मला म्हणायचं होतं की नॅश्नलाईज बँकेत विचारा.
आता ते आणि कोणचं ?
एस.बी.आय ला जावा.
यस्सबीआय ? काय राव, ह्यला काय आर्थ ?
म्हणजे ? ते तिथंच चालु होतंय ना.
आहो. चालु हू दे. त्यो विषय नही.
मग ? काय प्राॅब्लेम ?
प्राबलेम मंजे, तूमी तेवढंच इंगलीश बोलता. खरं तितली मॅनेजरबई पार्बलेम हूईल इतकं इंग्लीश बोलत्या.
तुम्ही पण बोलायच मग.
बोललोय राव. झेरो ब्यालन्स ला येटीम नही म्हणटली, पाचशे भरा म्हणत्या.
मग बघा पाटील, आपल्या तर बँकेला हे एटीमसुद्धा नाही. आणि तुम्ही म्हणताय. फेसबुकवर कर्ज द्या !
ते झालो ओ साहेब खरं मला येक सांगा. कसं कर्ज देतील ? तुमाला जरातर आयड्या असल की !
हो आहेच म्हणा ना.
मग सांगा की ?
तुमचं मोबाईल द्या. मग सांगतो.
(ह्यानं मोबाईल काढून दिलं. )
फेसबुक चालू करून द्या.
हां. हे घ्या.
बापरे, तूमच्यातर फोटोला तीनशे लाईक आहेत.
मग काय ? उगंच हाय का साहेब ? इळभर आस्तो बघा फेसबूकवर !
नाही माध्यमसंपर्क हवाच.
आवो संपर्क काय घिवून बसलाय. झी चुवीस तास. एबीपी, टीवी नाईन, आयबीयन सगळीकडं आस्तो.
आरे वा ! ह्यानं जनरल नाॅलेज वाढत बरं का !
व्हय तर, आता तुमाला म्हणून सांगतो. आनुश्का आणि विराट कोयलीचं भानगड. सगळ तोंडपाठ !
अच्छा.
आता आश्ट्रोलीयाला तिथं जवून मारून आली. ते बी पाठ हाय.
सिनेमा आणि क्रिडा प्रकारात खूप रस दिसतो तुम्हाला.
रस घ्यायसारखं दोनंच हायीत. तिसरं सांगा बघू ?
ऊसाच्या बिलाच काय झालं ?
काय राव ? तुमाला म्हीत नही. शेटींगच असत्या ती. तुमी नही ते विषय काढू नका ?
बरं. तुमचा इनबाॅक्स चेक करू ?
खुशाल करा.
Dimmpy : Gm rocky !
Sweety : g00d morn!nG
Ritu patel : hv niC£ da¥
Dj deepak : शुभप्रभात आपला दिवस मंगलमय जावो 卐卐卐
आडक्यांचा लाडका शुभम : mrng good. bad girls !!!
काय हे पाटील ? इतक्या मुलींचे मेसेज ! तेही इंग्रजीतून ??
साहेब मंबईच्या पोरी आहेत.
तुमचं ईंग्लीश चांगलं आहे.
ते राहू दे, मला किती कर्ज मिळल सांगा की.
मिळेल ओ. खरं एक काम करा की !
बोल्ला नुस्तं सायेब !
माझं एक अकाऊंट काढून द्या की !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं