हा म्हणटला काळी असली तरी चालंल खरं बायको समजूतदार पाहिजे. लग्नाअगोदर हा कसा ओळखणार ?
तरीपण आपल्या हातात आहे. ती समजूतदार असावी की कशी ते. काय करायचे ? 
लग्न झालं की बायकोला घरातंच ठेवणार नाही मी. चल म्हणटलं की तयार होतेच. तिला घेवून लांब निघून जायचं, खूप लांब जिथं सगळंच वेगळं असेल. रस्त्यावर हिंडणारी कुत्री नकोत तिथं, कावळा पण नको, डूक्कर, गाढव, ऊंदीर, वांडरं पण नकोत लाल असतील तर चालतील, पाणी निळं पाहीजे, तळातली मासं सुद्धा दिसली पायजेत. माणसं तर कसल्याच प्रकारची नकोत. शेतं असू देतं हिरवीगार, ऊगाच माळरान नको, काट्याची झाडं नकोच त्यात, आंब्याची बहार सूटलेली असू देत, डासपण नको तिथं. ऊगचंच जागेची बेआब्रू करणार्या काचांच्या कवळ्या असलेल्या इमारती पण नकोत. आणि जमिनीचं अस्तित्व झाकून केलेला गूळगूळीत डांबरीचा रस्ताही नको तिथं. लांबवर बघितल्यावर लाल तांबडं दिसणारा रस्ता आणि कुठंच न संपणारा असावा. गाडी चारचाकी, बूलेट, हाॅर्न , इंडिकेटर, बझर, कुंईकुंई काहीच नको. म्हणजे गाडी नको आणि सायकल पण नको. आणि हिल्सवाल्या किंवा लाईटवेटवाल्या चपला पण नकोत. तसं तुम्ही पोरकंच असता आणि पाय अनवानी असल्याच दुःख करत बसता. चपला नकोत. आपन दोघ असू. मग बोलतंच कोणपण ! म्हणून पहिला प्रश्न तु कुठल्या पक्षाची ? असं विचारू नये. फक्त बोलावं. काय बोलावं त्यात प्रश्न उत्तरं नकोत. तसं सगळंच बोलणं हे प्रश्नउत्तर असतंय. मग काय बोलायचं हाही एक प्रश्न आहे. चल चंद्रावर जावू असं म्हणटलं की तुम्ही प्रश्नच विचारलेला असता. ती जर म्हणटली येतो तरी तीनं उत्तर दिलेलंच असलं. नाही म्हणटली तरी ते उत्तरंच. मग ते कधी उद्गारवाचक, प्रश्नार्थक असतंय खरं ते उत्तरच असतंय. मग बोलाल तुम्ही. मिस तुम्ही करणार नाही एकमेकाला. म्हणजे इथून तिथं जातानाही आपन उगचच मिस यु, सीयु, आफ्टर सम टाईम याचा तिथं काही संबधच नसतो. बोर तर कोण होईल का ? कोणच बोरिंग नसतो. यष्टीतला कंडक्टरदेखील घंटी वाजवणारा. मग तुम्ही. असं दिवस जातील आणि रात्रही. मग हळूहळू वारं आणि तारखाही कुणाच्याच लक्षात येणार नाहीत. अंधार उजेड. उजेडात आपन एखाद्याला ठोकरून देतो. कारण असताना नसताना खरं रात्र तशी नाही अंधारात आवाजही आधार ठरतात. वाढत नाही की कमी पण होत नाही एकाच सूरात तो येतो. कुणाला पहिल्यांदा तारिख वेळेची आठवण येईल, तो कमी समजूतदार असेल. बहूतेक. मग तू काय ती ते तूझ तू ठरव.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं