लांब किरकिरत असणार्या रातकिड्यानी रात्र अजून भारी वाटते.

लांब किरकिरत असणार्या रातकिड्यानी रात्र अजून भारी वाटते. 
..................................................
Cute ऊंदीर असतात. इनबाॅक्सात येवून क्यूट दिसतोस म्हणटलेल्या पोरींचा निषेध ! 
..................................................
अजून संशोधन करून नवीन गोष्टी तयार करावं वाटत आहे.
...................................................
बोर मारल्यावर त्या पाण्यात मासे असतील का ? असा एकदा प्रश्न पडलाता. बर्याचजणाना विचारलो खरं नहीच म्हणटलीत. मग मीच एकदा वड्यातंन मासं धरून आणून बोरमध्ये टाकलोतो. काय झालं अशील कुणास ठवूक ? लगेच मेली नसतील.
...................................................
देवराष्ट्रमधल्या येशवंतराव चव्हाणांच्या घरात आज जावून आलो. अभिप्रायची वही होती. काय लिवायचं त्यात ?
........ .................................................
यष्टीच पास पंच करताना मास्तर लोक हारखत्यात.
..................................................
भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ हे तीन नसून आणखीही काळाचे प्रकार आहेत. उदा. अवकाळ.
..................................................
मेणबत्ती पाघळते. पाणी गोठून बर्फ होते, तापून वाफ होते. आपलं काय ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं