पाणी पाजवाय जाताना हे आठवतंयच.

ही गोष्ट चारवर्षामागची आहे. अशाच एका हिवाळ्यातल्या सकाळपारी, चूलतचूलतभावाला चहा द्यायला गेलतो. तो गावात राहतो. आम्ही मळ्यात. मग तो रात्री पाणी पाजवायला आला कि चहा नाष्टा वगैरे आमच्या घरातंन देतो. त्यादिवशी त्याला चहा देवून घराकडं येत होतो. तर एकदम रडण्याचा आवाज आला. मी घाबरलो, घरातंन बाहेर पडून पंधरा मिनटंच झालती. सगळं ठीक होतं येताना आणि एकदम रडण्याचा आवाज. तरीपण बघितल्यावर काय ते खरं कळलं म्हणून गेलो. घरात गेलो तर गावातली एक बाई कुडकूडत रडत होती, धाप भरलाता. काय सांगायला पण येईना. बापा गावाकडं दूध घालयला गेलते. भाऊ अभ्यास करायला बसलाता. मम्मी तिच्याजवळ थांबून काय झालंय ते सांगा ? म्हणेन विचारत होती. मम्मीच्या माहेरातल्या घराजवळची ही बाई. नंतर लक्षात आलं, आमच्या वरच्या पट्टीकडच्या पलिकडंच रान त्यानी करायला घेतलंत. थोडं शांत झाल्यावर सांगितली. आमचं त्यनी कुठं दिसनात. सगळ ऊस हूडकलो. पहाटं चारंला गायप झाल्यात. मला ऊसात जायला भ्या वाटाल्या. असं ऐकलं की कुणालापण धक्का बसतोच. मला पण बसला. शेजारपाजारी पण कोण नव्हते. कुठतरं विशाळगडला जाणार होते, त्यांना बोलवायला जाणं बरं वाटलं नही. मीच म्हणटलं चला बघूया. ती घरातंच बसली, मी आणि माझा भवू दोघं जण गेलं. वरंन खाली पाटापाटात बघायलं, मधल्या पाटात बॅटरी दिसली. भावाला बोलवलो. आत ऊस वाढलेलं आणि आडवंतिडवं पडलेलं. तसंच वाट काढत गेलं, तर पुढं तो माणूस पाटात पडलाता. पाणी चालूच होतं. भावाला उत्सूकता दादा हाय काय नही ते पहिला बघ ! म्हणटला. मला पण तेच बघू वाटालतं. पाटातंन जरा वर ढकललो. बांधावर ठेवलो. तर ते हलवताना घळघळ आवाज आला. मग हाताची नाडी बघितलो. तिथं काय मेळ दिसना, मग नाकातोंडाला हात लावलो श्वास चालू नव्हता. माणूस गेलाय हे ध्यानात आलं. आता खरी कसरत होती ते ऊसातंन बाहेर काढण्यात. भाऊ हात मी पाय धरलो. ऊचलंल तर ऊचलत नव्हतं. शिस्तीत जराजरा उचलत आणलो. सिद्धार्थ म्हणटला माझ्याकडं वझं व्हायलंय, तू हिकडं ये. मग मी तिकड गेलो. असं करत बाहेर आणलो. मग परत काहितरी करता येईल म्हणून वल्ले कपडे काढलो, अंग राड झालतं ते धूतलो. आणि जाळ करून त्याला शेकलं. वाफा यायलत्या त्याच्या अंगातंन. तेवढ्यात घरातंन फोनाफोनी झालती. त्याचा मूलगा आला. बाबा म्हणून रडायला लागला. त्याला संभाळून घेतलो त्याचा मित्र आलता . आम्ही सगळंजण मिळून रानातंन बाहेर काढलं. मूलगा आई रडालतीत. रोडला नेलं. गावातंन मित्र त्यांचाच भवूबंद आला आल्टोतंन नेलं. दवाखान्यात नेलं. तर दोन तासाआधीच अटॅक न तो गेलेलं कळलं.
पाणी पाजवाय जाताना हे आठवतंयच.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं