माणसांची आर्थिक किंमत करावी असे वाटत आहे.

माणसांची आर्थिक किंमत करावी असे वाटत आहे. 
बालपण काय राजपण
तरूणपण काय हारूपण
म्हातारपण काय कुत्तरपण 
अशे म्हणतात. कशे करावे ? 
बालपणात नाॅर्मल जन्मलेले हे गरीब असतात, शिजरन हून जन्मलेले श्रीमंत धरावे का ?
रिमोट कंट्रोलच्या, ईलेक्ट्रानिक, मोटर आसलेल्या, किंवा चल छयां छयांच्या खेळण्या असणारे असे श्रीमंत वाटत होते. पण आलिकडे आईबाबाचे फोटो किंवा व्हिडीओ शुटींग करणारे बारके पोरगे पोरगी बघून ओरिझनल मोबाईल वाले श्रीमंत वाटत आहेत.
इंग्लीश मेडमचे पोरं श्रीमंत, शेमी इंग्रज मध्यमवर्ग, तर मराठी माध्यम गरीब अशे समिकरण जूळवत होतो. पण ते फार काळ टिकले नाही. आंगठाछाप आप्प्याने आपलं पोरगं इंग्लीश मेडमला घातलं. रोज त्यची बायकू पाठीला शॅक आडकवून पोराला सोडायला जाते बसपर्यंत. तर दिल्लीला इंजनेर असणार्याने आपलं पोरगं गावातल्या मराठी शाळेत घातलं आणि वरनं पंचवीस हजार शाळेस दिले.
हायस्कूलात मास्तर समिकरण जूळवत होते. मोठेपणी कोण शिरमंत होईल. हूशारं पोरं शिरमंत होतील असे त्यांना वाटलेते. पण नंतरनं आयट्या केलेली पोरं शिरमंत झाली.
आर्टस, काॅमर्स सायन्स चे तशेच झाले आनुक्रमे गरीब मध्यमवर्गिय शिरमंत.
आमच्या हिकडं पोरं आर्टस करतात आणि यमपीयस्सी नहीतर पोलिस भरती मारतात. काय जमलं नही की सारे पाटलाच्या ग्रीनहौसला डबा घिवून कामाला जातात. कविता कोण करत नाही किंवा लेखक पण होत नही. बरेच जण शेतकरी होतात आणि ऊसाच्या आंदोलनला जातात.
माणूस सेटल झाला कि लगिन करतो. पण माझ्या तीन मित्राणी तसंच लगीन केलं. घर , कार्यालय, आणि कोर्ट अशी लग्निची ठिकाणं आहेत. घर शिरमंत, कार्यालय मध्यमवर्ग तसेच कोर्ट गरीब. पण हेही संकेत मोडले अशे वाटते. परवा एकटी काकू म्हणटली घरात कार्यक्रम असलं की चमचे गहाळ होतात. चमचा पंचवीस रूपयेला येतो. लगीन कार्यालयला पंचवीस हजार भाडं असतं. तिथं चमचे त्यानचेच असतात. काकूच्या हिशेबाने. वेळ कमी हाय.
माणूस मेला की जाळायला पूरायला प्रोसिजर आहे.
तूपात जाळणे, चंदणाच्या लाकडात जाळणे, यरंडमूंगळीच्या काटक्यात जाळणे, शेणकूटात जाळणे.
अलिकडे इलेक्ट्रानीक जाळणे आलेय. ईलेक्ट्रानिक शहरी आहे. धूर नही वास नाही. पिशवीभर राख. हाडं गावत नाहीत.
जाड माणूस श्रीमंत ठरवावा अशे वाटतेय. त्याला जाळायला मणभर लाकडं जास्तंच लागतात. अजून खूप आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं