मी बत्तीस वर्षाचा आहे. कालच्या 2 जानेवारीला मला बत्तीस वर्ष पुर्ण झाले. माझे वय वाढत चालले आहे. सगळ्यांचेच वय वाढते आणि माणूस कधी तर मरून जातो. कोणतर कितीतर जगतात, ते कसे वागले कसे वावरले यावरून त्याचे माप काढतात. लोकांना काम नसते ते मापं काढतात. ह्याने काय केलं, त्याने काय केलं, असे पॅरॅमीटर असतात. मला वाटते आपन जगून घेतले पाहिजे. कसे जगावे ? 
झोपलेला माणूस जगत असतो का ? नाही. आपन निद्रिस्त असतो तेव्हां काही कृती करत नसतो. फक्त स्वप्ने पडली तर बघने एवढंच कृती असते. मला स्वप्ने कधीतर पडतात. तुळी खाली झोपल्यास पडतात. काही लोक तुळीला तुळई म्हणतात आणि सळीला सळई म्हणतात. ई प्रत्यय जोडण्याचे काय काम असेल ? असू दे.
अलिकडे स्वप्ने चांगली पडत नाहीत. परवा केळी सोलल्यावर रताळ बाहेर पडलं. तर प्रत्यक्षात असं झालं की माझ्या गाडीखाली साप येवून मेला आणि घरात वांग्याची भाजी ! मला जेवन गेले नाही. निद्रीस्त असलेली वेळ आयुष्यात धरावी की नाही यात मी साशंक आहे.
आत्ता बत्तीसाव्या वर्षात कुठंतर बत्ती लावली पाहिजे असं वाटतंय. काय करू ? मी काॅम्प्युटर इंजिनयर आहे. कसं काय करू ? मला बावीस हजार पगार आहे. त्यात माझे भागते. बायकोमुळे अवघड झाले आहे. बायको एम.ए शिकलीये. घरात बसते. एम. ए केलेले लोक पुस्तक लिवू शकतात. हिला वाचनाची आवड आहे. महिन्याला चारपाच हजारची पुस्तके आणते. वाचते की नाही ते माहित नाही. मी फक्त मोटीव्हेशनल पुस्तंक वाचतो. माझा पगार बावीस हजार आहे. पोरगं आहे मला एक. परवा त्याचं नवस फेडलो. बायकोने लगीन झाल्यावर लगेच नवस बोलली. दोन महिन्यात. नवस केल्यापासून आठव्या महिन्यात पोरगं झालं. मला जोक वाटलं. पोराचे नाव जोक ठेवावे असे वाटलेते. बायको परवा स्तोत्र असलेलं एक पुस्तक आणली आठशे रूपयंच. मी वीस रूपयेच कव्हर आणलो तर म्हणटली नका घालू, त्यावरचे महाराज गुदमरतील म्हणटली. मी चैनी करत नाही. नोकरी करतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं