त्यांना कोपर्यात घेवून भारतरत्न दिला पाहीजे.

हाॅटसपवर नवीन आलं की लोक त्याला संभाळून घेतात आणि प्रोत्साहन देतात. हे बाकि कुठं बघायला मिळत नाही. दिवसाला चारदा डीपी बदलणे सूरू होते. आणि त्याचबरोबर स्टेटस सुद्धा बदलले जातात. 
म्हणजे सकाळी काॅफीचा मग आणि स्टेटस गुड माॅर्निंग.
दूपारी कुठतर चांगल्या माॅलमध्ये काढलेला फोटो. आणि स्टेटस गूड आफ्टरनुन नाऊ बिझि इन वर्क. 
तिन्हीसांजला सुर्य बूडतानचा फोटो आणि स्टेटस गुड ईव्हनींग नाऊ फ्री फ्राॅम वर्क वगैरे.
असे दोनचार महिने जातात. मग नंतर त्याच त्याच गोष्टीचा कंटाळ येतो. 
त्यातंच कोणतर काय मटरेल असलं तर पाठव की ल्यका. असे मेसेज पाठवतात.
ग्रुपवर चॅटींग चालू असताना कोणतर एखादी पोरगी मेसेज टाकली की ग्रुप बोंबलला पर्सनल चॅटींग चालू.
मग पोरगीची तारिफ वाॅव हाऊ नाईस डीपी.!
तिचे शाॅर्टफाॅर्म रिप्लाय 10x ह्यला कळायच बंद हूतंय. काय ते ? मग ति थँक्स म्हणते. व्हाटसपवर पायजे त्या स्मायल्या येत्यात. कधीकधी लाल दिल चावलेली कींवा बूबळाच्या ठिकाणी दिल असलेली स्मायली पोराला येडं करून टाकते. बराच वेळ असं गेल्यावर सामाजिक ग्रूपवर एड केल जातं. मग परत बोंब. अशे ग्रूपमेंबर लै डेंजर. हे एक टायपू पर्यंत दहामेसेज येतात. मुद्दा बोंबलतो. आणी सर्वसमावेशक चर्चा होते.
ग्रूपवर राजकारण चालतं. धर्मकारणचालतं. प्रेम होतं, आत्ताआत्ता कायपण असतं.
आफवा पिकवायच सर्वात मोठं ठिकाण.
इथं कायपण फूलतं आणि पेटतंसूद्धा.
ग्रूपची नाव लै भारी - दोन लाव, चटका कर, इनोसंट, सूतळी ग्रूप, जेजमेंट ग्रूप, जायंटस ग्रूप, आठाण्याला चार.
कुणाला तर पोरगी पटली की ......ला पटली. कुणाच तर ब्रेकप झालं की .........ची सुटली. कुणाचतर लग्न झालं की ..... च वाजलं. अशी नावे बदलतात.
नंतरनंतर कंटाळा येतो आणि वाॅटसपचे मेसेज फक्त चेक केले जातात. रिप्लाय कधीतरंच.
जे वाॅटसपवर यिळभर रातभर पडून असतात त्यांना कोपर्यात घेवून भारतरत्न दिला पाहीजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं