स्वप्नांची कितीतर स्क्रीनशाॅट सेव्ह केल्यात.
हातकणंगले लोकसभेच्या निकालाचे गणित!
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत आहे. (१) धैर्यशील माने - (शिंदे शिवसेना) (२) राजू शेट्टी- (स्वाभिमानी) (३) सत्यजित आबा सरूडकर (शिवसेना उद्धव ठाकरे) (४) डी.सी.पाटील (वंचित) हे प्रमुख उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे गेले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा जुना ईचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. इथल्या मागील चार निवडणूकांचा अभ्यास केल्यावर काही निरीक्षणं समोर येतात. २००९-२०१४-२०१९ या तीन निवडणूकांत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट (काँग्रेस, राष्ट्रवादी,कारखानदार, साखरसम्राट, सहकारसम्राट ई.) यांच्या विरोधी मतं पडलेली आहेत. २००९ राजू शेट्टी २०१४ राजू शेट्टी यावेळी राजू शेट्टी हे शरद पवार गट यांचेविरोधात लढत होते. २००९ मध्ये ९५,००० इतकं लीड निवेदिता माने यांचे विरूद्ध शेट्टींना मिळालं होतं. (* यावेळी काही काँग्रेसजनांचा छुपा पाठिंबा होता.) तर २०१४ मध्ये राजू शेट्टी हे परत शरद पवार गट विरोधात भाजप -शिवसेनेच्या पाठिंब्यावर लढले. त्यावेळी त्यांचे मताधिक्य कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे विरूद्ध १,७७,००० इतकं अफाट होतं. २०१९ च्या निवडणूकी पुर्वीच शेट्टींनी मोदींची, महायुती च...
टिप्पण्या