डाॅक्टरांच्या गोष्टी.


चवथीला असताना आन्या मानेला पायात पाय घालून पाडलोतो. त्यचा गूडगा फूटला. मग आम्ही चारजण हून त्यला दवाखान्याला नेलं. आमच्या गावात एक डाक्टर आहे, त्यो आधी कमपाऊंडर हूता. त्यांच्याकडं कुठलीच पदवी नाही. तरीबी त्यचा गुण येतोय असं गाव म्हणतंय. आन्याला नेलो तर स्पिरिट ऊजव्या हाताला चोळला आणि इंजेक्शन डाव्या हाताला दिला.
.....................................................
शाळेत दोन वर्षातंन एकदा धनूर्वातंच इंजेक्शन द्यायला एक बाई यायची. ती ह्यकनी हूती. कंबरंतच इंजेक्शन द्यायची. गडबडगडबड करत पुढं व्हायचो आणि बिनइंजेक्शन घेता चड्डी चोळत वर्गाबाहेर पडायचो. एकदा मास्तरंन धरलं. कुठ चाललायस ? म्हणटला. मी म्हणटलो आऊट आलंय बर्फ लावायला. परत धरून मला वर्गात नेला आणि इंजेक्शन केला.
...................................................
मी जन्मल्यावर लगेच माझं तिसर्या महिन्यात हरण्याचं ऑपरेशन झालं होतं. मला त्यातलं काहीच आठवत नाही. घरच्यांना सगळं आठवतं.
...................................................
एकदा दाढवाणला पैण उटलंत. आज्जी पैण लिवायची. तिनं पैण लिवलीती पण कमी झालं नही. मग सांगलीच्या शहा डाॅक्टरच्या दवाखाण्याला मी आणि आज्जा गेलो. इंजेक्शन म्हणटलं की मला भ्या वाटायची. अजूनपण वाटते. शहा डाॅक्टर चांगला. दवाखना बी भारी हूता. आणि आत गेलो तर ते इंजेक्शन पण देत नव्हते. फक्त औषध लिहून दिलं. मी म्हणटलं तुम्ही चांगलं हायीसा. तिथंच त्यांच्या कपाटात एक खेळण्यातली गाडी होती. मला ती आवडलीती. मी सारखं तिकडंच बघालतो. ते खुर्चीतंन ऊठले आणि आणि कपाटातली ती गाडी काढून मला दिली. आणि म्हणटलं अभ्यास करायचं. आज्जांच्या बरोबर येताना मी ती गाडी स्टँडवरपण हाताने ढकलत होतो.
.................... .............................
अकरावीत असताना डोक्यात चाई झालती. थोडे केस गेलते. कितीही उपचार केलं तरी काय होत नव्हतं. टोपी घालून वैतागलोतो. मग आमच्या डाॅक्टरानी औषध लिवून दिलं. ते जयसिंगपूरातंन आणलो. मग ती बाटली त्यांना दिली. ते म्हणटले कुणाला तर घेवून ये. नांदणीच्या मम्मीच्या काकांना म्हणजे माझ्या चुलत आज्जांना घेवून गेलो. तर डाॅक्टरमामा म्हणटले, डोक्यात इंजेक्शन द्यायचं आहे. मी घाबरलो. डब झोपलो इंजेक्शन डोक्यात घूसवलं एकदम कळ आली, डोस्कं फिरलं. नर्सला व्हलपाटीतंच दिलो. मग साताठजण झाले आणि घच्च दाबून धरले. मग इंजेक्शन दिलीत. अठरा इंजेक्शन झाले. डाॅक्टरानी दिलेलं शाम्पू वापरलो आणि केसं आले परत.
नाहीतर मी खूप घाबरलोतो. आत्ता कसं व्हायचं ? म्हणून.
..................................................
मित्राला अपेंडीक्स झालतं गेल्यावर्षी. मो त्याला घेवून गेलो दवाखण्यात. शनिवार होता. ऑपरेशन कधी करायचं हा विषय होता. हा मला आधीच सांगितलाता सोमवारच्या पुढं कधीही करूयात. कारण सोमवारी हा छावीला घेवून मुव्हीला जाणार होता. डाॅक्टरच्या केबीनातंन बाहेर काढलो ह्याला आणि डाॅक्टरला म्हणटलं सोमवारीच करून टाका. हा नंतर आत आला तोपर्यंत आम्ही ठरवलंत. ह्या गड्यानं मला शिव्या घातल्या. मला त्यच्या प्लॅनचं वाट लावल्याच आनंद झालतं. सोमवारी ऑपरेशन झालं. डाॅक्टर म्हणटला, एकदिवस जरी पुढं गेलं असतं तर फूटलं असतं. मग मित्राला बर वाटलं.
....................................................
2015 सालात मी एकही इंजेक्शन घेतलं नाही. किंवा दवाखण्याला गेलो नाही. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ट्रकडायव्हरांचे काय चुकले?

भाजपची उलटी गणती वेगाने सुरू झालेली आहे.

पावसाचं आवाज कसा येतं